अ‍ॅपशहर

मानुषी छिल्लरची निवड मीच केली होती: नेहा

अभिनेत्री नेहा धुपियाने मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 'मिस वर्ल्ड स्पर्धेला पाठविण्यासाठी गेल्या वर्षी मीच मानुषीची निवड केली होती आणि मानुषीने देशाचं नाव उज्ज्वल केलं,' असं नेहा धुपियाने सांगितलं.

नेहा वर्मा | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Mar 2018, 4:01 pm
नवी दिल्ली: अभिनेत्री नेहा धुपियाने मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 'मिस वर्ल्ड स्पर्धेला पाठविण्यासाठी गेल्या वर्षी मीच मानुषीची निवड केली होती आणि मानुषीने देशाचं नाव उज्ज्वल केलं,' असं नेहा धुपियाने सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i chose the manushi chhillar said neha dhupia
मानुषी छिल्लरची निवड मीच केली होती: नेहा


'नवभारत टाइम्स'शी संवाद साधताना नेहा धुपियाने हे वक्तव्य केलं. 'मानुषीचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे. मानुषीची मी मेंटॉर होते. गेल्या वर्षी मीच तिची निवड केली होती. तिने देशाचं नाव उज्ज्वल केलं. यावर्षीही माझ्याकडे हिच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मानुषीप्रमाणेच आपल्याला मिस इंडिया आणि मिस वर्ल्ड मिळेल यासाठी माझा प्रयत्न असेल,' असं नेहाने सांगितले.

नेहा धुपिया लवकरच 'रोडीज' शोच्या तिसऱ्या पर्वात जजच्या भूमिकेत दिसणार आहे. साहसी खेळ हे आपलं पॅशन असून रोडीजद्वारे हे पॅशन कायम राखता आल्याचं तिने सांगितलं. या शोमधून बरंच काही शिकायला मिळाल्याचंही ती म्हणाली. हा नुसता साहसी शो नाही तर हा शो विचार करायला प्रवृत्त करणाराही आहे, असंही तिने स्पष्ट केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज