अ‍ॅपशहर

'PM, CM शी चांगले संबंध, जामीन द्या'

जामीन मिळण्यासाठी एखाद्यानं काय कारण द्यावं बरं? 'माझे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत, म्हणून मला जामीन दिला जावा,' अशी मागणी भाजपच्या एका माजी नगरसेवकाने सत्र न्यायालयात केली आहे. वडोदरा येथील नगरसेवक असलेल्या हशित तलाती यांनी आपले पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यासोबतचे फोटोही उच्च न्यायालयात सादर केले. अर्थात न्यायालयाचे त्याची याचिका फेटाळून लावली.

Maharashtra Times 22 Mar 2017, 6:45 pm
अहमदाबाद मिरर। अहमदाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i have good relations with pm and cm grant me bail
'PM, CM शी चांगले संबंध, जामीन द्या'

जामीन मिळण्यासाठी एखाद्यानं काय कारण द्यावं बरं? 'माझे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत, म्हणून मला जामीन दिला जावा,' अशी मागणी भाजपच्या एका माजी नगरसेवकाने सत्र न्यायालयात केली आहे. वडोदरा येथील नगरसेवक असलेल्या हशित तलाती यांनी आपले पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यासोबतचे फोटोही उच्च न्यायालयात सादर केले. अर्थात न्यायालयाचे त्याची याचिका फेटाळून लावली.

गुन्हे अन्वेषण विभागाने एका गुन्ह्याच्या प्रकरणात तलाती याला अटक केली आहे. वडोदरा येथील गायत्रीनगर सोसायटीच्या कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्यातला तलाती एक आरोपी आहे. तो फरार होता. नंतर त्याने कोर्टात अग्रीम जामिनासाठी अर्ज केला होता. आपल्याया जामीन का दिला जावा याबाबतचे स्पष्टीकरण देताना त्याने आपल्या राजकीय कारकिर्दीचा पाढा वाचला होता.

तलातीने लिहीले होते की, 'मी एक उद्योगपती आहे. भाजपसाठी मी गेली कित्येक वर्षे राजकारणात सक्रीय आहे. राजकारणात माझी मुळे मजबूत आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यासोबत माझे चांगले संबंध आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांशी माझे चांगले संबंध आहेत. मी अशी व्यक्ती नाही जी सुनावणी सुरू असताना फरार होईल.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज