अ‍ॅपशहर

...तर भाजपला शेवटचा नमस्कार करेन: चंद्राबाबू

केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू प्रचंड नाराज आहेत. 'मी नेहमीच मैत्री धर्माला जागलो. कधीच मैत्रीचा विश्वासघात केला नाही. जर त्यांनी अजूनही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मी त्यांना शेवटचा नमस्कार करून माझ्या मार्गाने निघून जाईन,' असा इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2018, 9:01 am
हैदराबाद: केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू प्रचंड नाराज आहेत. 'मी नेहमीच मैत्री धर्माला जागलो. कधीच मैत्रीचा विश्वासघात केला नाही. जर त्यांनी अजूनही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मी त्यांना शेवटचा नमस्कार करून माझ्या मार्गाने निघून जाईन,' असा इशारा चंद्राबाबू नायडू यांनी दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i never break mitra dharma andhra cm chandrababu naidu on tdp bjp coalition
...तर भाजपला शेवटचा नमस्कार करेन: चंद्राबाबू


उद्योग मंडळ भारतीय उद्योग परिसंघाच्या संमेलनाला संबोधित करताना चंद्राबाबू बोलत होते. '२०१४ मध्ये आंध्रप्रदेशचं विभाजन करून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. स्वतंत्र राज्याच्या निर्मिती वेळी आंध्रप्रदेशावर अन्याय झाला आहे,' असं ते म्हणाले. राज्याची घडी नीट बसविण्यासाठी कठोर परिश्रम घेण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारने राज्यासाठी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचं यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशाच्या तोंडाला पाने पुसण्यात आल्याच्या निषेधार्थ टीडीपीच्या खासदारांनी लोकसभेत गोंधळ घातला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज