अ‍ॅपशहर

abhinandan: अभिनंदन यांच्या आईवडिलांचा अनोखा सन्मान

मध्यरात्रीनंतर जेव्हा चेन्नई-दिल्ली विमान दिल्लीतील धावपट्टीवर थांबले, तेव्हा सामान काढण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झालेली पाहायला मिळाली नाही. त्यावेळी सर्वांच्या नजरा एका जोडप्याकडे वळल्या होत्या. ... ते होते भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे आईबाबा. यावेळी प्रवाशांनी उभे राहत टाळ्यांच्या कडडाटात निवृत्त एअर मार्शल एस. वर्तमान आणि डॉ. शोभा वर्तमान यांचे स्वागत केले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2019, 1:08 pm

हायलाइट्स:

  • भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे आईबाबा. यावेळी प्रवाशांनी उभे राहत टाळ्यांच्या कडडाटात निवृत्त एअर मार्शल एस. वर्तमान आणि डॉ. शोभा वर्तमान यांचे स्वागत केले.
  • दिल्लीत उतरल्यानंतर अभिनंदन यांचे आईवडील लगेचच अमृतसरला रवाना झाले. आज ते वाघा बॉर्डरवर देशातील नागरिकांसह आपल्या शूर मुलाचे स्वागत करतील.
  • 'अभी जीवंत आहे, तो जायबंदी नाही. तो मानसिकदृष्ट्या अतिशय खंबीर आहे हे त्याच्या बोलण्यावरून लक्षात येते... तो खरा सैनिक आहे.. आम्हाला त्याचा अभिमान आहे', अशी प्रतिक्रिया अभिनंदन यांचे वडील एअर मार्शल एस. वर्तमान यांनी व्यक्त केली आहे.
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
नवी दिल्ली
मध्यरात्रीनंतर जेव्हा चेन्नई-दिल्ली विमान दिल्लीतील धावपट्टीवर थांबले, तेव्हा सामान काढण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झालेली पाहायला मिळाली नाही. त्यावेळी सर्वांच्या नजरा एका जोडप्याकडे वळल्या होत्या. ... ते होते भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे आईबाबा. यावेळी प्रवाशांनी उभे राहत टाळ्यांच्या कडडाटात निवृत्त एअर मार्शल एस. वर्तमान आणि डॉ. शोभा वर्तमान यांचे स्वागत केले. वर्तमान आणि त्यांच्या पत्नी जो पर्यंत विमानाबाहेर पडले नाहीत, तो पर्यंत कुणीही प्रवासी जागचा हलला नाही.

चेन्नईहून दिल्लीला आलेले वर्तमान दाम्पत्य दिल्लीहून अमृतसरला जात होते. आपला शूर मुलगा विंग कमांडर अभिनंदन यांना आपल्या घरी आणण्यासाठी जात असणाऱ्या या आईबाबांना अनेक प्रवाशांनी टाळ्या वाजवत, जयघोषासह हस्तालोंदन करत त्यांचे आभार मानले.

दिल्लीत उतरल्यानंतर अभिनंदन यांचे आईवडील लगेचच अमृतसरला रवाना झाले. आज ते वाघा बॉर्डरवर देशातील नागरिकांसह आपल्या शूर मुलाचे स्वागत करतील.

पाकिस्तानी लढाऊ विमानांना पळवून लावण्याच्या प्रयत्नात विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांचे विमान कोसळले आणि अभिनंदन पाक लष्कराच्या ताब्यात गेले. अभिनंदन यांना शुक्रवारी भारतात परत पाठवण्यात येईल असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी जाहीर केले.

'अभिनंदन खरा सैनिक आहे'

अभिनंदन यांच्या कुटुंबाने दुसऱ्या महायुद्धापासूनच हवाई दलात आपली सेवा दिली आहे. एअर मार्शल एस. वर्तमान यांचा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांना परम विशिष्ट सेवा पुरस्कारही मिळाला आहे. 'अभी जीवंत आहे, तो जायबंदी नाही. तो मानसिकदृष्ट्या अतिशय खंबीर आहे हे त्याच्या बोलण्यावरून लक्षात येते... तो खरा सैनिक आहे.. आम्हाला त्याचा अभिमान आहे', अशी प्रतिक्रिया अभिनंदन यांचे वडील एअर मार्शल एस. वर्तमान यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज