अ‍ॅपशहर

करोनामुळे नवा धोका! होऊ शकतो हा गंभीर परिणाम! जाणून घ्या काय आहे फेस ब्लाइंडनेस

Face Blindness : जगभरात करोनाचे साइड इफेक्ट्स काय होऊ शकतात हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. वास न येणे, स्वाद ओळखता न येणे, एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित न होणे, स्मृती कमी होणे असे परिणामही झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Mar 2023, 5:55 pm
नवी दिल्ली : करोना या गंभीर महामारीचा नवा धोका आता जाणवू लागला आहे. वैश्विक महामारी कोविड-१९ चा संसर्ग माणसात्या शरीरात जर दीर्घकाळ राहिलेला असेल, तर लोकांचे चेहरे ओळखणे आणि रस्ते ओळखण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात असे करोनाच्या परिणामांबाबत करण्यात आलेल्या एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे. या पूर्वी वास न येणे, स्वाद न येणे, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता येणे, स्मृती कमजोर होणे, बोलण्यात समस्या जाणवणे यांसह अनेक तांत्रिक समस्या निर्माण होऊ शकतात असे स्पष्ट झालेले होते. कोर्टेक्स या पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या लेखात पहिल्यांदाच दीर्घकाळ करोनाने आजारी राहिलेल्या व्यक्तीला फेस ब्लाइंडनेस येऊ शकतो,असे म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम face blindness
फेस ब्लाइंडनेस


काय आहे फेस ब्लाइंडनेस

फेस ब्लाइंडनेस एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये लोकांना आपल्या परिचयाच्या लोकांचे चेहरे ओळखणे कठीण जाऊ शकते.जगभरातील २ ते २.५ टक्के लोकांना या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. संशोधकाने अमेरिकेत अॅनी या २८ वर्षीय तरुणीला आलेल्या समस्यांचा अभ्यास केला. या तरुणीला मार्च २०२० मध्ये करोना झाला होता. त्यानंतर दोन महिने तिला विविध लक्षणे जाणवत होती. अॅनी आता लोकांना त्यांच्या आवाजाद्वारे ओळखते असे अमेरिकेतील डार्टमाऊथ कॉलेजची विद्यार्थिनी मेरी लुईस किसलर हिने म्हटले आहे. जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटले तेव्हा ती मला म्हणाले की मी माझ्या कुटुंबातील लोकांचे चेहरेही आठवू शकत नाही, असे तिने मला सांगितले असे मेरीने म्हटले आहे.

ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांचा हल्ला, तिरंग्याचाही केला अपमान
रस्तेसुद्धा ओळखणे जाते कठीण

अॅनीला करोना झाल्यानंतर तिला रस्तेही ओळखता येत नव्हते. ती किराणा दुकानात एखादी वस्तू कुठे ठेवलेली आहे हे देखील तिला आठवत नसे. ती आपली गाडी पार्क केल्यानंतर आपल्या गाडीचे स्थान गुगल मॅपवर पिन करून ठेवत असे. डार्टमाउथमधील एक प्राध्यापक आणि ज्येष्ठ लेखक ब्रॅड डचॅन यांनी सांगितले की, 'चेहेरे ओळखण्यात आणि दिशा लक्षात ठेवण्याच्या समस्या एकत्र आल्यामुळे अॅनीने आमचे लक्ष वेधून घेतले. या समस्या मेंदूच्या नुकसानामुळे किंवा विकासाच्या समस्यांमुळे अनेकदा एकत्र उत्पन्न होतात.'

साताऱ्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ, रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यानेच मारला ६३ लाखांवर डल्ला
मेंदूचे नुकसान झाल्यानंतर येतात ओळखण्याची समस्या

नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांनी सांगितले की, 'कोविड-१९ मुळे फेस ब्लाइंडनेसचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही, परंतु अनेक संभाव्य कारणे आहेत. सुरी म्हणाले, 'COVID-19 च्या दीर्घकालीन लक्षणांमध्ये अनेक न्यूरोलॉजिकल लक्षणांचा समावेश आहे, ज्यामुळे मेंदूमध्ये अनेक समस्या उद्भवू शकतात. यामध्ये चेहऱ्याना ओळखता न येण्याची समस्या, ओळखीचे चेहरे ओळखण्यात अडचण असा समस्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कोविड -१९ मुळे रक्तवाहिन्यांना जळजळ आणि नुकसान होऊ शकते. यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होऊ शकतो, असे ते म्हणाले. यामुळे मेंदूचे नुकसान होऊ शकते, तसेच गोष्टी लक्षात ठेवण्यात आणि चेहरा ओळखण्यात समस्या निर्माण होतात, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख