अ‍ॅपशहर

पुरावे न दिल्यास याचिका निकाली

सहारा-बिर्ला छापाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तीन मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी याचिकाकर्त्यांना फटकारले. या प्रकरणी दोन दिवसांत ठोस पुरावे सादर करा, अन्यथा ही याचिका निकालात काढण्यात येईल, असे न्यायमूर्ती जे. एस. खेहार यांनी याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांना सुनावले. यावेळी भूषण व न्यायमूर्तींमध्ये खडाजंगीही झाली.

Maharashtra Times 15 Dec 2016, 8:23 am
समन्वय रौत्राय, ईटी वृत्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम if not disposed of evidence petition
पुरावे न दिल्यास याचिका निकाली


नवी दिल्ली : सहारा-बिर्ला छापाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तीन मुख्यमंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी याचिकाकर्त्यांना फटकारले. या प्रकरणी दोन दिवसांत ठोस पुरावे सादर करा, अन्यथा ही याचिका निकालात काढण्यात येईल, असे न्यायमूर्ती जे. एस. खेहार यांनी याचिकाकर्ते प्रशांत भूषण यांना सुनावले. यावेळी भूषण व न्यायमूर्तींमध्ये खडाजंगीही झाली.

मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोठा आर्थिक घोटाळा झाला असून त्यात अन्य तीन राज्यांचे मुख्यमंत्रीही दोषी आहेत, असा आरोप भूषण यांनी एका याचिकेद्वारे केला आहे. मात्र त्यासाठी आवश्यक पुरावे त्यांनी सादर केलेले नाहीत. आपण ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्या व्यक्ती उच्चपदस्थ असून अशा व्यक्तींवर असेच आरोप होत राहिले तर त्यांना कामकाज करणे कठीणे होईल. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे सादर करा, अन्यथा ही याचिका निकालात काढण्यात येईल, असे खेहार म्हणाले. यावर न्यायालयाच्या हिवाळी सुटीनंतर हे पुरावे सादर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भूषण यांनी केली. त्यावर तुम्ही एखादा लहान पुरावा सादर केला तरी त्यावर सुनावणी होऊ शकेल. परंतु किरकोळ कागदपत्रांच्या आधारे अशा व्यक्तींवर असे आरोप होत राहिले तर ते काम कसे करणार, असा सवाल न्यायमूर्तींनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज