अ‍ॅपशहर

लोकहो, आता ऐका 'धन की बात'

महागाईचा चढता आलेख पाहता प्रत्येकासाठी अत्यंत गरजेची बनलेली गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजनाचं हे गणित खरंतर किचकट आणि कटकटीचं असतं. पण लवकरच ते सोपं होणार आहे. कारण, आर्थिक नियोजनासाठी आवश्यक अशा प्रत्येक महत्त्वाच्या बाबीवर एका अॅपद्वारे मार्गदर्शन मिळणार आहे. 'धन की बात' नावाचं हे अॅप नुकतंच आयआयएफएल समूहानं सुरू केलं आहे.

Maharashtra Times 29 Nov 2017, 2:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त । दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम iifl launched dhan ki baat portal for financial knowledge
लोकहो, आता ऐका 'धन की बात'

महागाईचा चढता आलेख पाहता प्रत्येकासाठी अत्यंत गरजेची बनलेली गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजनाचं हे गणित खरंतर किचकट आणि कटकटीचं असतं. पण लवकरच ते सोपं होणार आहे. कारण, आर्थिक नियोजनासाठी आवश्यक अशा प्रत्येक महत्त्वाच्या बाबीवर एका अॅपद्वारे मार्गदर्शन मिळणार आहे. 'धन की बात' नावाचं हे अॅप नुकतंच आयआयएफएल समूहानं सुरू केलं आहे.

कमावलेल्या पैशांची गुंतवणूक कशी, कुठे आणि किती प्रमाणात करावी?, याबाबत प्रत्येकाच्या मनात संभ्रम असतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'धन की बात' हे अॅप आणि वेवसाइट देणार आहे. आर्थिक नियोजनाची माहिती देणारे लेख, व्हिडिओ तसेच तज्ज्ञांच्या मुलाखतींचा समावेश या अॅपमध्ये आहे. या अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून आपल्या अर्थविषयक शंका थेट तज्ज्ञांसमोर मांडता येणार आहेत.

म्युच्युअल फंड, लिक्विड फंड, गुंतवणुकीचे प्लॅन्स असे वेगवेगळे विषय हे अॅप हाताळेल. 'प्रत्येक भारतीयाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम करणं आमचं ध्येय आहे. त्यामुळंच आम्ही आर्थिक साक्षरतेचा प्रचार करण्यासाठी काम करत आहोत,' असं 'आयआयएफएल'चे संचालक निर्मल जैन यांनी सांगितलं. अॅप न वापरणाऱ्यांसाठी खास dhankibaat.co.in ही वेबसाइटही तयार करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज