अ‍ॅपशहर

डॉक्टरांचा सोमवारी देशव्यापी संप

पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या सोमवारी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्यातही या संपाचे पडसाद उमटणार असून अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे सेंटर बंद राहणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jun 2019, 7:20 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम strike

पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) उद्या सोमवारी देशव्यापी संप पुकारला आहे. राज्यातही या संपाचे पडसाद उमटणार असून अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्सरे सेंटर बंद राहणार आहेत.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल राज्यांना सूचना देत डॉक्टरांवरील हिंसा रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितले आहे. डॉक्टर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्वसमावेशक असा कायदा हवा अशी आयएमएची मागणी आहे.

'कायद्यात डॉक्टरांविरोधात हिंसक होणाऱ्यांची उदाहरणे देऊन योग्य त्या शिक्षेची तरतूद करायला हवी. यासाठी भारतीय दंड संहिता तसेच दिवाणी प्रक्रिया संहितेतही बदल केले गेले पाहिजेत,' असं आयएमएचं म्हणणं आहे.

संपाच्या २४ तासांत म्हणजेच सोमवारी १७ जून रोजी पहाटे ६ ते मंगळवारी पहाटे ६ वाजेपर्यंत अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा बंद राहतील, असं आयएमएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आयएमएने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहूनदेखील डॉक्टरांविरोधात हिंसा रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज