अ‍ॅपशहर

आज १५ राज्यांवर पाऊससंकट

देशातली १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधलं हवामान सोमवारी खराब असणार आहे. वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 May 2018, 6:10 am
नवी दिल्ली : देशातली १३ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधलं हवामान सोमवारी खराब असणार आहे. वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rain


जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील काही भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि उत्तराखंड आणि पंजाबच्या काही भागात गडगडाटासह पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. मागील आठवडयातही पाच राज्यात धुळीचं वादळ आणि मुसळधार पाऊन पडला होता. या धुळीच्या वादळानं १२४ बळी घेतले, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले होते.

गृहमंत्रालयाच्या एक अधिकाऱ्याने भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाचा उल्लेश करत सांगितलं की आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामधील काही भागात सोमवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज आहे.

राजस्थानच्या पश्चिमेकडच्या काही भागात धुळीचं वादळ आणि गडगडाटासह पाऊन पडू शकतो. वादळ आणि पावसाच्या शक्यतेमुळे हरयाणा सरकारने ७ आणि ८ मेला सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज