अ‍ॅपशहर

एका झटक्यात मालामाल; २ लाखांत विकत घेतलेली वस्तू थेट विकली ७२ कोटींना!

Auction Flower Vase : एक शुल्लक वस्तू जी काही लाखांमध्ये विकत घेण्यात आली होती ती चक्क ७२ करोडमध्ये विकण्यात आली आहे. इथे एक व्यक्ती रातोरात करोडपती झाला आहे. त्याने लाखांमध्ये असलेली अशी वस्तू थेट करोडोंमध्ये विकली.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2022, 2:17 pm
नवी दिल्ली : 'देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के' ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या म्हणीप्रमाणे अनेक घटनाही समोर आल्या आहेत. असाच एक अनोखा प्रकार चीनमध्ये समोर आला आहे. इथे एक व्यक्ती रातोरात करोडपती झाला आहे. त्याने लाखांमध्ये असलेली अशी वस्तू थेट करोडोंमध्ये विकली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम auction flower vase


एक चायनीज फुलदाणी (Flower Vase) , ज्याची मूळ किंमत सुमारे दीड लाख रुपये होती, ती ७२ कोटी रुपयांना विकली गेली आहे. या फुलदाणीचा लिलाव अतिशय रंजक पद्धतीने पार पडला. सगळ्यात विशेष म्हणजे ३००-४०० लोकांनी ती खरेदी करण्यात रस दाखवला.

Noru Cyclone : नोरू चक्रीवादळामुळे देशावर अस्मानी संकट, महाराष्ट्रासह २० राज्यांना रेड अलर्ट
एका छोट्या फुलदाणीसाठी एवढी मोठी रक्कम कोणी कशी देऊ शकते यावर फुलदाणीच्या मालकाचाही विश्वास बसत नव्हता. शनिवारी पॅरिसमधील फॉन्टेनब्लू येथील ओसेनॅट ऑक्शन हाऊसने या चिनी फुलदाणीचा लिलाव केला. सुरुवातीला त्याची किंमत दीड ते दोन लाख रुपये असल्याचे मानले जात होते. मात्र, लिलावात ही प्राचीन फुलदाणी ७२ कोटी रुपयांना विकली गेली.

निळ्या आणि पांढर्‍या टिआनक्युपिंग फुलदाणीची किंमत लिलावात मूळ किंमतीच्या कित्येक हजार पट आहे. फुलदाणीचे धड गोलाकार आणि मान दंडगोलाकार आहे. तो एक गुलालासारखा आहे. त्यावर ढग आणि ड्रॅगनची कलाकृती आहे.

सिटी हॉलमध्ये अज्ञाताकडून गोळीबार; महापौर, पोलिसांसह तब्बल १८ जणांचा जागीच मृत्यू
या लिलावामुळे त्यांचे आयुष्य बदलून जाईल, असे लिलाव गृहाचे प्रमुख पियरे यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की फुलदाणीचे मालक परदेशात राहतात. या फुलदाणीसह अनेक वस्तू त्यांनी आपल्या दिवंगत आजीच्या घरून आणल्या होत्या.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख