अ‍ॅपशहर

देशाचा ७५वा की ७६वा स्वातंत्र्य दिन? गोंधळ होतोय तर समजून घ्या...

Independence Day 2022: देशात आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून जनतेला स्वातंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Aug 2022, 10:03 am
नवी दिल्ली: संपूर्ण देशात आज (१५ ऑगस्ट) ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवाचा उत्साह गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा मोहिमेला जनतेने मोठा प्रतिसाद दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Independence Day 2022


स्वातंत्र्याचा हा अमृतमहोत्सव साजरा करताना काही जण ७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या देत आहेत तर काही जण ७६व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. भारताचा हा नेमका कितवा स्वतंत्र्य दिन आहे अशा तुमचा देखील गोंधळ होत असेल तर जाणून घेऊयात हा कितवा स्वतंत्र्य दिन आहे.

वाचा- कुख्यात दहशतवाद्याच्या कुटुंबीयांनी फडकावला तिरंगा; स्वातंत्र्यदिनी मुलाला दिला महत्त्वाचा संदेश

भारताला ब्रिटिशांकडून १५ ऑग्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. याचा अर्थ १५ ऑगस्ट १९४८ रोजी देशाच्या स्वातंत्र्याला एक वर्ष पूर्ण झाले. म्हणजे तो स्वातंत्र्याची वर्षपूर्ती होती. देशाचा आज कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे मोजताना १५ ऑगस्ट १९४७ ही स्वातंत्र्याची मुळ तारीख देखील गणली जाते.

वाचा- कोण आहेत महाराव मदन सिंह? फक्त ८९ दिवसांचा राज्यकारभार; 'जय हिंद' लिहून इतिहासात अमर झाले

यामुळेच यंदा म्हणजे २०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असली तरी हा देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठे ही ७६वा स्वातंत्र्य दिन असा उल्लेख आढळला तर तो चुकीचा असणार नाही .

मोदींकडून जनतेला शुभेच्छा

लाल किल्यावर ध्वजारोहण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला आणि जगभरात पसरलेल्या भारतीय नागरिकांना स्वतंत्र्याच्या शुभेच्छा दिल्या. मोदींनी गेल्या ७५ वर्षात देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या सर्वांचा उल्लेख केला. त्याच बरोबर पुढील २५ वर्षात 'पंचप्राण' शक्ती देखील सांगितली. यात विकसित भारत, गुलामीचा अंश काढून टाका, ऐतिहासिक वारसा, एकता अणि एकजुटी आणि नागरिकांचे कर्तव्य या गोष्टींचा समावेश होता.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख