अ‍ॅपशहर

covid vaccination : भारताचा करोना लसीकरणात नवा विक्रम; 'या' जिल्ह्यात झाले १०० टक्के लसीकरण

करोनावरील लसीकरण मोहीमेत भारताला मोठे यश आले आहे. देशात आज १ कोटीहून अधिक नागरिकांना करोनावरील लस दिली गेली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Sep 2021, 8:08 am
नवी दिल्लीः भारताने करोनावरील लसीकरण मोहीमेत नवा रेकॉर्ड बनवला आहे. देशात मंगळवारी ३१ ऑगस्टला १.२१ कोटीहून अधिक नागरिकांना करोनावरील लसीचा डोस देण्यात आला. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. लसीकरणाचा आजचा आकडा हा १ कोटी ९ लाखांवर गेला आहे, असं त्यांनी सांगितलं. हा आकडा संध्याकाळी ६ वाजेपर्यंतचा आहे. अजूनही काही ठिकाणी लसीकरण सुरू आहे, असं ते म्हणाले. यापूर्वी २७ ऑगस्टला १ कोटी ८ लाखांवर नागरिकांना लसीचा डोस दिला गेला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india administers another 1 crore covid 19 vaccinations today
भारताचा करोना लसीकरणात नवा विक्रम; 'या' जिल्ह्यात झाले १०० टक्के लसीकरण


देशात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ६५ कोटींहून अधिक नागरिकांना लसीचे डोस दिले गेले आहेत. यातील ५०.३१ कोटी नागरिकांना करोनावरील लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. तर १४.९४ कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत.

इंदूर जिल्ह्यात झाले १०० टक्के लसीकरण

स्वच्छता, स्मार्ट सिटीत देशात आघाडीवर असलेल्या इंदूर जिल्ह्यातील १०० टक्के लोकसंख्येला करोनावरील लसीचा पहिला डोस दिला आहे. १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणात इंदूर टॉपवर आहे.

new covid variant : चिंतेत भर! आला करोनाचा नवीन वेरियंट, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

covid third wave : देशात करोनाची तिसरी लाट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टिपेला पोहोचेल!

जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा ही मंगळवारी करोनावरील लसीचा पहिला डोस दोण्याचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी झटत होती. ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना वेगवगेळ्या माध्यमातून शोधण्यात आलं. आरोग्य पथकं इमारतींमधील प्रत्येक मजल्यांवर गेले. दूरवरील गावांमध्ये आणि शेतांमध्ये मोबाइल व्हॅन पाठवण्यात आली. संध्याकाळ होता होता १०० टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीचा पहिला डोस दिला गेला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज