अ‍ॅपशहर

गलवानमध्ये भारत-चीन मागे हटण्यास तयार; बैठकीत झाली सहमती

भारत आणि चीनदरम्यान पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सैन्य स्तरावरील चर्चेदरम्यान दोन्ही देशांनी मागे हटण्यावर सहमती दर्शवली आहे. दोन्ही पक्षांना दोन्ही देशांदरम्यान निर्माण झालेला तणाव कमी करायचा असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jul 2020, 9:00 am
नवी दिल्ली: भारत आणि चीन पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात, तसेच गोगरा हॉट स्प्रिंगवर शांततेच्या मार्गाने मार्ग काढण्यावर सहमत झाले आहेत. दोन्ही देश लडाखमधील या भागातून हळूहळू आणि प्रामाणिकपणे आपापल्या सेना मागे घेणार आहेत. या पूर्वी देखील दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सैन्य स्तरावरील चर्चेनंतर आपापले सैन्य मागे हटवण्यावर सहमती झाली होती. मात्र चीनी सैनिकांनी या सहमतीचे पालन न केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर १५ जूनला दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सैन्य मागे हटवण्यावर भारत-चीनची सहमती


असे असले तरी या चर्चेदरम्यान पँगाँग सरोवर परिसराबाबत भारताला यश मिळू शकलेले नाही. या परिसराबाबत दोन्ही देशांदरम्यान असलेला पेच कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथे पीएलए (चीनी) सैनिकांचे मोठ्या संख्येने बंकर उभे आहेत. चीनी सैनिकांनी फिंगर ४ ते ८ पर्यंत आपला कब्जा केल्यानंतर येथील सर्वाच उंच शिखरावरही चीनी सैनिकांनी आपला कब्जा केला आहे.

वाचा: भारत-चीन तणाव; संरक्षणमंत्र्यांसह लष्कर प्रमुख शुक्रवारी लडाखला जाणार

बुधवारी अधिकृत सूत्रांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दोन्ही पक्ष लवकरात लवकर हा तणाव दूर करण्याचा प्रयत्नात आहेत आणि येथून मागे हटण्यावर दोन्हीकडून सहमती दर्शवली गेली आहे. सैन्य स्तरावर १२ तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीनंतर ६ जूननंतर झालेली ही दोन्ही देशांदरम्यानची तिसरी बैठक होती. या बैठकीत भारताकडून १४ कॉर्प्स कंमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदरसिंह नेतृत्व करत होते. तर, चीनकडून दक्षिण शिनजियांग जिल्हा मुख्य मेजर जनरल लुई लिन या चर्चेत सहभागी झाले होते.

वाचा: आमचं सैन्य कधीही भारतासोबत; हा बलाढ्य देश समर्थनार्थ मैदानात

मात्र, ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. या चर्चेत अजूनही अनेक गोष्टींचा समावेश करण्यात यायचा आहे. या वेळी मात्र भारत चीन मागे हटतो की नाही यावर अतिशय सावधपणे लक्ष ठेवणार आहे. भारतीय भूमीत घुसखोरी केलेला चीन गलवान खोरे आणि हॉट स्प्रिंग क्षेत्रात असलेल्या पेट्रोलिंग पॉइंट (PP) १४, १५ आणि १७ अ पासून निघून जात आहे की नाही यावर भारताला लक्ष ठेवावे लागणार आहे. पँगाँग सो सरोवरच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर असलेले हे शिखर सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जाते.

वाचा: 'मोदी विरुद्ध मनमोहन'; चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधीनी काढले 'हे' अस्त्र

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज