अ‍ॅपशहर

शेजारधर्म! आजपासून भारत 'या' सहा देशांना पुरवणार करोना लस

Corona Vaccine : कोव्हिड १९ विरुद्ध भारतात सुरु झालेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेनंतर आता 'शेजारधर्म' म्हणून भारताकडून मित्र आणि सहकारी देशांनाही लस पुरवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2021, 10:22 am
नवी दिल्ली : आजपासून (बुधवार) भारताकडून सहायता अनुदानांतर्गत येणाऱ्या सहा देशांना कोव्हिड १९ लस पुरवण्यात येणार आहे. या देशांमध्ये भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार आणि सशेल्स या देशांचा समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शेजारधर्म! आजपासून भारत या सहा देशांना पुरवणार करोना लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो)


कोणत्या परिस्थितीत लस घेऊ नये? 'भारत बायोटेक'ची फॅक्टशीट जाहीर
'आंतरराष्ट्रीय समुदायाच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वासू सहकारी बनणं, भारतासाठी गौरवास्पद आहे. बुधवारपासून लसींच्या पुरवण्याला सुरुवात होईल. येणाऱ्या काही दिवसांत आणखीही घडामोडी घडतील' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर म्हटलं गेलंय.


तुमच्या राज्यात कधी, कुठे, केव्हा... करोना लसीकरणाचं संपूर्ण वेळापत्रक
देशांतर्गत गरज लक्षात घेतानाच भारत येणाऱ्या काही आठवड्यांत, महिन्यांत टप्प्याटप्प्यानं सहकारी देशांना कोव्हिड १९ लसीचा पुरवठा करेल, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

लसीला नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन रोखण्याचा आदेश, वादानंतर माघार
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि मॉरीशिअस या देशांसोबत लसींच्या पुरवठ्यासंदर्भात आवश्यक नियामक मंजुरीची भारत प्रतिक्षा करत आहे. लसींच्या पुरवठ्यासाठी अनेक सहकारी आणि शेजारी देशांकडून भारतनिर्मित लसींची विचारणा भारताला करण्यात आलीय. कोव्हिड महामारीविरुद्ध मानवतेच्या या युद्धात सर्वांना मदत आणि भारतनिर्मित लसीच्या उत्पादनाच्या तसंच पुरवठ्याची वचनबद्धता ध्यानात घेता २० जानेवारीपासून भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार, सेशेल्स या देशांना लस पुरवठा सुरू केला जाईल', असंही मंत्रालयाकडूनं म्हटलं गेलंय.

दारु प्यायल्यानंतर डॉक्टरनं घेतला करोनाचा डोस, तब्येत बिघडल्यानं खळबळ
भारतात १६ जानेवारीपासून कोव्हिड १९ विरुद्ध जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आलीय. पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत जवळपास ६.३१ लाखहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज