>>महमद वजिहुद्दीन
भारत हा अत्यंत सहिष्णू देश असून मला इथे कोणत्याही प्रकारचे भय जाणवत नाही. तसेच अन्य राष्ट्रांपेक्षा भारतात मुस्लिम अधिक सुरक्षित आहेत, अशा शब्दांत अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा यांनी भारताची स्तुती केली.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांना उत्तरे देताना सलमा आगा यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली. ‘मी जन्माने पाकिस्तानी असली तरी माझ्याकडे ब्रिटनचा पासपोर्ट आहे. भारतात असल्यावर मी आईच्या घरी मुंबईला असते. भारताला मी माझे घरच समजते’, असे आगा म्हणाल्या.
‘भारतात विविध विचारांचे, संस्कृतीचे लोक एकत्र नांदतात. येथे मुस्लिमांमध्ये शिया आणि सुन्नी असे वाद झाल्याचे कधी आढळत नाही. अन्य देशांच्या तुलनेत भारतात मुस्लिम अधिक सुरक्षित आहेत. त्यामुळेच केवळ तक्रारी करत बसण्यापेक्षा मिळणाऱ्या संधीचं सोनं केलं पाहिजे’, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
मोदींसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत प्रभावीपणे भारताचे नेतृत्व करत आहेत. मी आणि माझ्या मुलीने मोदींचे अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील भाषण ऐकले. त्यांच्या भाषणात सर्वसमावेशकता दिसते.’