अ‍ॅपशहर

चिन्यांना भारताची त्यांच्याच चालीने मात, भूमिगत चक्रव्यूह तयार

भारत-चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये सीमेवर तणाव आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असली तरी त्यावर अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे चीन सीमेवर आपली बाजू बळकट करत आहे. यामुळे भारतीय लष्करानेही चीनला जशास तसं उत्तर देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2020, 8:28 pm
नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (lac border) भारत-चीनमध्ये तणाव कायम आहे. भारतापेक्षा आपण किती वरचढ आहोत याचा प्रचार (propaganda) चीन करतोय. आता भारतीय लष्कराने चीनला त्याच्याच चालीने त्याच्यावर मात केलीय. भारतीय लष्कराने चीनच्या युद्ध मॅन्युअलचा छडा लावलाय आणि ड्रॅगनच्या कोणत्याही कारवाईला सणसणीत उत्तर देण्यासाठी लडाखमध्ये 'tunnel defences' तैनात केले आहेत. चिनी सैन्याने जपानविरुद्धच्या दुसर्‍या युद्धात ही युक्ती वापरली होती, हिंदुस्थान टाइम्स हे वृत्त दिलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india china standoff
चिन्यांना भारताची त्यांच्याच चालीने मात, भूमिगत चक्रव्यूह तयार


चिनी सैन्याची (PLA) पूर्ण तयारी

पीएलएने ल्हासा एअरबेसवर लढाऊ विमानं तैनात करण्यासाठी बोगदे बनवले असून दक्षिण चीन समुद्रात अण्विक पाणबुडी ठेवण्यासाठी हेनान बेटावर भूमिगत तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या जावानांना शत्रूच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी आणि प्रसंगी हल्ले करण्यासाठी भारतीय लष्कराने मोठ्या व्यासाचे ह्युम काँक्रीट पाइप्सचे बोगदे तयार केले आहेत, अशी माहिती भारतीय लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलीय.

ह्युम पाइप विशेष का आहेत?

ह्यूम पाइप्स (Hume reinforced concrete pipes) हे ६ ते ८ फूट व्यासाचे आहेत. या भूमिगत पाइप्सद्वारे जवान एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी सहज पोहोचू शतात. यामुळे शत्रूच्या गोळीबारापासून त्यांचा बचाव होतो. या बोगद्यांचा फायदा म्हणजे ते थंडीत गरमही होऊ शकतात आणि हिम वादळांपासून बचावासाठी जवान त्यात आश्रयही घेऊ शकतात.

नगरोटात ठार झालेले दहशतवादी 'इथून' भारतात घुसले!

कारवाईचे सर्व पर्याय खुले, भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

लडाखमध्ये तणाव

पूर्वेकडील लडाखमधील गालवान खोऱ्यात दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर उभे आहेत. मे पासून भारत आणि चीनमध्ये तणाव आहे. आतापर्यंत या भागात दोन हिंसक संघर्ष झाले आहेत. तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशांमधील सैन्यात आणि मुत्सद्दी स्तरावर बैठका सुरू असून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात चीनकडून एक धोका आहे. तिथे ड्रॅगन आक्रमक झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज