अ‍ॅपशहर

पँगाँगमध्ये भारतीय लष्कराच्या उपस्थितीने चीन चिंतेत, केली 'ही' मागणी

भारत-चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून तणाव आहे. आता लडाखमध्ये थंडीची सुरवात झालीय. उणे तापमानामुळे चिनी सैनिकांचे हाल होत आहे. दुसरीकडे लडाखमध्ये भारताची बाजू भक्कम असल्याने चीन चिंतेत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2020, 7:51 pm
नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या स्थितीत भारत आणि चीन सैन्यात कॉर्प्स स्तरावर सहाव्यांदा बैठक झाली. २९ ऑगस्टच्या झडपेनंतर पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्यावरील शिखरांवरून भारतीय लष्कराने मागे हटावं, अशी मागणी या बैठकीत चीनने केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pangong lake ladakh
पँगाँगमध्ये भारतीय लष्कराच्या उपस्थितीने चीन चिंतेत, भारतीय जवानांना हटवण्याची मागणी ( प्रातिनिधिक फोटो )


पूर्व लडाखमध्ये एप्रिल आणि मे २०२० च्या पूर्वीची स्थिती जैस थे करावी आणि आपले सैन्य मागे घ्यावं असं भारताने या बैठकीत चीनला स्पष्ट केलं आहे. तर पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळी शिखरांवरून भारतीय लष्कराने मागे हटावं, असं चीनने म्हटलंय.

पँगाँगचा दक्षिण किनारा भारतासाठी महत्त्वाचा

पँगाँग सरोवराचा दक्षिण किनाऱ्याचा भाग भारतासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो. कारण या ठिकाणी भारतीय लष्कराचा ताबा आहे. या भागात भारतीय लष्कराची उपस्थिती नेहमीच जास्त असते. तर सरोवराच्या उत्तर भागात भारतीय जवान फक्त गस्त घालत असतात.

याच कारणामुळे चीन चर्चेदरम्यान इथून भारतीय जवानांना हटवण्याची मागणी करत आहे. पँगाँग सरोवराचा दक्षिणेकडील भाग चुशूल आणि रेजांग लाच्या जवळ आहे.

चुशूल हा असा भाग आहे ज्याचा उपयोग हल्ला करण्यासाठी लाँच पॅड म्हणून करता येऊ शकतो. कारण या भागातील बरीच जमीन ही सपाट आहे. ही जागा लष्कराच्या हालचालींसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते.

१९६२ च्या युद्धाच्या वेळी चीनने पँगाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेकडील दोन्ही भागांचा भारता विरुद्ध वापर केला आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

सीमेवरील तणावाचं वातावरण दूर करण्यासाठी दोन्ही देशातील सैन्यात चर्चा सुरू ठेवण्यास आणि एकमेकांशी संवाद कायम ठेवण्यास भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ४ हजार रुपये जमा करणार, मध्य प्रदेश सरकारची मोठी घोषणा

भारत आणि चिनी सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी बैठक झाली. ही बैठक बराच काळ चालली. सुमारे १३ तास चाललेल्या या बैठकीत भारताने कडक भूमिका घेत आली. चीनने तातडीने सर्व वादग्रस्त ठिकाणांहून मागे हटावं, अशी मागणी भारताने केली. यासह सैन्य माघारी घेण्याची सुरवात चीनने करावी. कारण सीमेवरील तणाव हा चीननेच वाढवला आहे, असं भारताने स्पष्ट केलंय.

५१७ कोटींहून अधिक खर्च, ५८ देश आणि ५ वर्षे; PM मोदींच्या विदेश दौऱ्यांचा लेखाजोखा

चीन सैन्य मागे घेतले नाही आणि एप्रिल-मेपूर्वीची सीमेवरील स्थिती जैसे थे केली नाही तर भारतीय सैन्य दीर्घकालीन लढ्यासाठी सज्ज आहे. म्हणजेच भारतीय सैन्य हिवाळ्यातही सीमेवर तैनात असेल, असं भारताने या बैठकीत चीनला सुनावलंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज