अ‍ॅपशहर

मायलेकांच्या मनावर चीनचा कब्जा, भाजपचा हल्लाबोल

भारत-चीन सीमेवरील तणावारून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच सरकराच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. आता काँग्रेससह सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपनेही हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2020, 6:04 pm
नवी दिल्लीः पूर्व लडाखमध्ये भारत-चीनमध्ये ( india china face off ) तणाव आहे. अशातच दिल्लीत राजकारण तापलं आहे. चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर काँग्रेस ( congress ) सवाल उपस्थित करून जवानांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. एककीडे लष्कर प्रमुख लेहमध्ये दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक घेऊन देशाच्या लष्कराविरोधातच लढाईचा बिगुल वाजवला आहे, असा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा ( bjp ) यांनी केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम काँग्रेस-भाजपमध्ये चीनवरून आरोप-प्रत्यारोप


भारताने इंचभर जमीनही चीनला दिलेला नाही आणि कुणी जमीन बळकावू शकतही नाही. पण खेदाची बाब म्हणजे काँग्रेस पक्षाने आपली लाजच सरेंडर केली आहे. चिनी सैन्याकडून देशाच्या कुठल्याही जागेव कब्जा झालेला नाही, हे पंतप्रधान मोदींनी आधीच स्पष्ट केलं आहे, असं संबित पात्रा म्हणाले.

काँग्रेसचा सकाळपासून आरडाओरडाः पात्रा

चीनसोबत सीमावाद सुरू आहे. पण भारताची एका इंच जमिनीवरही चीनचा कब्जा नाहीए. कब्जा झालाच आहे तर तो मायलेकांच्या मनावर. २००८च्या परस्पर सामंजस्य करारानंतर चीने कब्जा केल्याची शक्यता आहे, असं संबित पात्रा म्हणाले.

पी चिदम्बरम यांचा हल्लाबोल

काँग्रेसची सत्ता असताना चीनने जवळपास ६०० वेळा घुसखोरी केली होती, असा आरोप भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर केला. तर २०१५ पासून ते आतापर्यंत चीनने २२६४ वेळा घुसखोरीचा प्रयत्न केला. पण यावर पंतप्रधान मोदींकडून स्पष्टीकरण मागण्याची नड्डांची हिंमत नाही, असं काँग्रेस नेते पी चिदम्बरम म्हणाले. हा घुसखोरी झाली होती. पण चीनने कुठल्याही भूभागावर कब्जा केला नव्हता आणि कुठल्या हिंसक संघर्षात भारतीय जवान शहीद झाले होते, असं ट्विट करत चिदम्बरम यांनी भाजपवर टीका केली.

सोनिया गांधींचा आरोप

केंद्रातील भाजप प्रणित सरकारचे ढिसाळ व्यवस्थापन आणि चुकीच्या धोरणांमुळे देशाला सध्या आर्थिक संकट, करोना व्हायरस आणि चीनशी तणावाचा सामना करावा लागतोय, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी केला. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज