अ‍ॅपशहर

चीनला मोठा झटका देण्याची तयारी, नितीन गडकरींनी सांगितला प्लान

पूर्व लडाखमध्ये आक्रमक झालेल्या चीनला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. चीनच्या दबावाला न झुकता त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने सैन्य स्तरासह आर्थिक पातळीवरही दणका देण्याची तयारी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2020, 3:30 am
नवी दिल्ली: सीमेवर भारतावर डोळे वटारणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी भारत सैन्य स्तरासह आर्थिक आघाडीवर खूपच सक्रिय आहे. चीनमधून येणार्‍या अनेक प्रकारच्या वस्तूंना बंदी घातलेल्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे आणि आता बर्‍याच गोष्टींवर आयात शुल्क वाढवण्याची तयारी सुरू आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी विशेषत: लघु उद्योगांमध्ये भारत ज्या क्षेत्रात आयातीवर अधिक अवलंबून आहे अशा क्षेत्रांमध्ये स्वावलंबी होण्यासाठी आयात शुल्क वाढवण्याचा विचार करावा लागेल, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nitin gadkari : चीनला मोठा झटका देण्याची तयारी, गडकरींनी सांगितला प्लान


'आपल्याला कदाचित हे आवडत नसेल, पण काही बाबतीत आम्हाला आयात शुल्क वाढवावं लागेल. जोपर्यंत आपण चीनसारखे उत्पादन वाढवत नाही तोपर्यंत आपल्या वस्तूची किंमत कमी होणार नाही. त्यामुळे आपल्याला आयात शुल्क वाढवणं आणि भारतीय उत्पादकांना प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. जेव्हा जास्त उत्पादन होईल तेव्हा स्वाभाविकच आपण प्रतिस्पर्धी बनू शकतो', असं नितीन गडकरी म्हणाले.

आयात उत्पादनांची ओळख करावी लागेल

लघु उद्योगांना सर्वाधिक आयात होणारी उत्पादने उद्योगांना ओळखावी लागतील. भारतीय उद्योगांनी आयात केली जाणारी उत्पादने ओळखून त्या क्षेत्रातील व्यवसाय सुलभ करण्यासाठी त्यातील अडथळे ओळखले पाहिजेत. इतर देशांकडून, विशेषत: चीनकडून होणाऱ्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने मे महिन्यात आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे, असं गडकरी म्हणाले.

'देश जेव्हा जेव्हा भावुक झाला, त्यावेळी फाइल्स गायब झाल्या', चीनवरून राहुल गांधींचा निशाणा

देशाला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी आयात केलेल्या वस्तूंना स्वदेशी पर्याय देण्याची आवाहन त्यांनी केले. चीनची ७० टक्के निर्यात ही १० क्षेत्रांशी संबंधित आहे. या क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिकल मशिन्स आणि उपकरणे देखील आहेत. ज्यात चीनच्या एकूण निर्यातीतील ६७१ अब्ज डॉलर म्हणजेच २६.०९ टक्के वाटा आहे. याशिवाय संगणकासह मशीनरी निर्यातीत १०.७० टक्क्यांची निर्यात म्हणजे ४१७ अब्ज डॉलर्सचे योगदान आहे, असं गडकरी म्हणाले.

सावधान! भारतात धोकादायक बियाणं पाठवण्याचा चीनचा कट, केंद्राचा अॅलर्ट जारी

'जय श्रीराम', 'मोदी जिंदाबाद' न म्हटल्याने रिक्षा चालकाला मारहाण, दोघांना अटक

संपूर्ण देशात उद्योगांचे नेटवर्क

महानगर आणि विकसनशील शहरांच्या पलीकडे ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात उद्योजकांचे जाळे उभारण्यावर भर देण्याचे आवाहन गडकरी यांनी केले. 'मला हे वाईट वाटते की उद्योग संस्थांचे ९० टक्के लक्ष मोठी शहरे आणि महानगरांमधील प्रमुख उद्योगांवर आहे. ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागांकडे दुर्लक्ष झाले आहे. हे बदलण्याची गरज आहे. भारताला महासत्ता बनवण्यासाठी क्षेत्रनिहाय नियोजन करण्याची काळाची गरज आहे, असं नितीन गडकरींनी सीआयआयच्या कार्यक्रमात सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज