अ‍ॅपशहर

आधी सर्वपक्षीय बैठक; नंतर मोदी देशाला संबोधित करणार

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील हालचाली वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जूनला देशाला संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी केंद्र सरकारची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक होईल. देशातील विरोधकांनीही सीमेवर काय चाललंय, याची माहिती सरकारकडे मागितली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2020, 2:34 pm
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचाली वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. चीन विरुद्ध सीमेवर काय झालं आणि सध्याची परिस्थिती याविषयी पंतप्रधान मोदी राजकीय पक्षांना विचारात घेतील. त्यानंतर २१ जूनला मोदी देशाला संबोधित करणार आहेत. आतापर्यंत २० जवान सीमेवर शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारमध्ये हालचाली वाढल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india china tensions pm modi to address nation post all party meeting on china issue
आधी सर्वपक्षीय बैठक; नंतर मोदी देशाला संबोधित करणार


रात्रीपर्यंत सुरू होते 'युद्ध'; चीनी सीमेवरील २० शहिदांची कहाणी

सर्वपक्षीय बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये सर्व पक्षांचे अध्यक्ष उपस्थित असतील. अनेक पक्षांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण नेमकं चाललंय काय याची माहिती द्या, अशी मागणी सरकारकडे केली आहे. नुकतीच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यानंतर आता मोदी स्वतः राजकीय पक्षांना विचारात घेणार आहेत.

कष्टानं उभारलं घर, पण हुतात्म्याचा मृतदेहच नव्या घरात होणार दाखल!

देशाला संबोधन

कोणत्याही मोठ्या संकटाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतात. यापूर्वी पाकिस्तानने भारतीय सैनिकांवर केलेला हल्ला असो, किंवा कोणताही निर्णय, पंतप्रधान मोदींनी प्रत्येक वेळी देशाला संबोधित केलं आहे. आता चीनविरोधात भारताची काय रणनिती असेल याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातूनच समोर येईल.

पंतप्रधान गप्प का?, कुठे लपला आहात?, घाबरू नका, आम्ही सोबत आहोत: राहुल

विरोधकांची काय आहे मागणी?

लडाखमध्ये चीनी सैनिकांविरुद्ध झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेत सुमारे ४३ चिनी सैनिकही ठार झाले आहेत. चिनी सैनिकांच्या या भयानक कृत्याचा देशभर विरोध होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका ट्विटद्वारे देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय सैनिक हुतात्मा

आपल्या ट्विटमध्ये माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लिहितात की, 'देशातील शूर शहीदांना माझा सलाम' राहुल यांनी आपल्या ट्विटसह एक व्हिडिओही शेअऱ केला आहे. दोन दिवसांपूर्वी भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. कुटुंबातील छिनले. चीनने आमची जमीन हडप केली. पंतप्रधान तुम्ही गप्प का आहात? तू कुठे लपवत आहेस? बाहेर या. संपूर्ण देश, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी उभे आहोत. बाहेर या आणि देशाला सत्य सांगा, घाबरू नका, असे राहुल गांधी यांनी या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज