अ‍ॅपशहर

Lic Ipo india china : LIC चा IPO येणार; कुरघोड्या चीनची गुंतवणूक रोखण्याच्या तयारीत भारत

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत-चीनमधील तणाव काहिसा कमी झाला आहे. पण चीनने ज्या प्रकारे तणाव वाढवला आणि त्यातून निर्माण झालेल्या हिसंक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले, हे भारत विसरलेला नाही. यामुळेच सावध रहात भारताने LIC मध्ये चीनची गुंतवणूक रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2021, 5:37 pm
नवी दिल्लीः विमा क्षेत्रातील दिग्गज विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) मधील शेअर्स खरेदी करण्यापासून चिनी गुंतवणूकदारांना रोखण्याचा भारताचा प्रयत्न आहे. LIC चा IPO लवकरच येत आहे. दोन देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती दोन वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि एका बँकरने दिल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात आलं आहे. LIC म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे आणि ५०० अब्ज डॉलर्स इतक्या मालमत्तेसह देशातील जीवन विमा बाजारपेठेत ६० टक्क्यांहून अधिक वाटा हा एलआयसीचा आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम India likely to block Chinese investment in insurance giant LICs IPO -sources
विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी LIC चा IPO येणार, चिनी गुंतवणूक रोखण्याच्या तयारीत भारत


देशातील या सर्वात मोठ्या आयपीओमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना सहभागी होण्याची परवानगी देण्याची योजना सरकार आखत आहे. यावेळी चिनी गुंतवणूकदारांवरही सरकारची नजर असणार आहे. या IPO चे संभाव्य मूल्य 12.2 अब्ज डॉलर इतके आहे, असं सूत्रांनी सांगितलं. 'चीनशी झालेल्या तणावानंतर चीनशी नेहमीसारखा व्यापार करता येणार नाही. आपसातील विश्वासाचा अभाव लक्षणीय वाढला आहे आणि एलआयसी सारख्या कंपनीमध्ये चीनी गुंतवणूक धोका वाढवू शकते, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

Jammu Kashmir: दहशतवाद्यांशी संबंध, सहा सरकारी कर्मचाऱ्यांवर बरखास्तीची कारवाई

भारत आणि चीन यांच्यात गेल्या वर्षापासून सीमेवर तणावाची स्थिती आहे. गेल्या वर्षी पूर्व लडाख मध्ये LAC जवळ दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. चिनी सैनिकांनी भारतीय सैनिकांवर धारदार रॉड, खिळे आणि लोखंडी तारांच्या काठ्या आणि दगडांनी हल्ला केला होता. या संघर्षात चिनी सैन्याचीही मोठी जीवितहानी झाली. या संघर्षात ४५ चीनी सैनिक एकतर मारले गेले किंवा गंभीर जखमी झाले, असं बोललं जातंय.

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर, असा ठरलाय भरगच्च कार्यक्रम

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज