अ‍ॅपशहर

भारत-नेपाळमध्ये १७ ऑगस्टला बैठक, सीमावादाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता

पूर्व लडाखमध्ये भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव आहे. तर दुसरीकडे चीनच्या इशाऱ्यावर नाचणारा नेपाळ आता सीमावादाचा मुद्दा ताणत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये १७ ऑगस्टला परराष्ट्र स्तरावर बैठक होत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Aug 2020, 3:39 am
नवी दिल्लीः भारत आणि नेपाळमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांत परराष्ट्र मंत्रालय पातळीवर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची १७ ऑगस्टला नेपाळची राजधानी काठमांडू येथे बैठक होणार आहे. परराष्ट्र सचिव शंकरदास बैरागी हे नेपाळच्या वतीने तर नेपाळमधील भारताचे राजदूत विनय क्वाटरा यांच्यात ही बैठक होईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india nepal : भारत - नेपाळमध्ये १७ ऑगस्टला बैठक, सीमावादाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता


दोन्ही देशांमधील परराष्ट्र मंत्रालय पातळीवरील ही बैठक नियमित अंतराने आर्थिक आणि विकासाशी संबंधित मुद्द्यांवरील द्विपक्षीय बैठक असल्याचं बोललं जातंय. २०१६ पासून या बैठका होत आल्या आहेत. तर दोन्ही देश चर्चेसाठी तारीख निश्चित करण्यासाठी बोलत होते, असं नेपाळ सरकारमधील सूत्रांकडून सांगण्यात आल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय.

भारत सरकारच्या सूत्रांनीही या बैठकीबाबत दुजोरा दिला आहे. या बैठकीत नियमित अंतराने होणाऱ्या या बैठकीत विकास योजनांवर चर्चा होईल. तर या बैठकीत सीमा वादाचा मुद्दाही उपस्थित केला जाईल, असा दावा नेपाळ सरकारमधील सूत्रांनी केला आहे. नेपाळच्या संसदेने जूनमध्ये नवीन नकाशाला मंजुरी दिली होती. यात कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या भारतातील तीन भागांवर दावा केला गेला आहे.

भारतीय सैन्य कुठल्याही स्थितीसाठी सज्जः सीडीएस बिपीन रावत

चिनी नागरिकांच्या मनी लाँड्रींगचा भांडाफोड, आयटीचे अनेक ठिकाणी छापे

नेपाळच्या भारतीय भूभागावरील केलेल्या दाव्याला कोणतेही ऐतिहासिक तथ्य किंवा पुरावा नाही. सीमावादावरील नेपाळचा हा निर्णय दोन्ही देशातील परस्पर सामंजस्याचे उल्लंघन आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली होती. तर चर्चेचे सर्व मार्ग आम्ही खुले ठेवले आहेत. मात्र भारताकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असं नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञावली म्हणाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज