अ‍ॅपशहर

vaccination world record : भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड! PM मोदींच्या वाढदिवसाला दिले करोना लसीचे २.५ कोटी डोस

भारताने करोनावरील लसीकरण मोहीमेत एक जागतिक विक्रम केला आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने भारताने अडीच कोटींहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचा विक्रम केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2021, 1:19 am
नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त लसीकरण मोहिमेला चालना देत करोनावरील लसीचे २.५ कोटीहून अधिक डोस देऊन एक विक्रम प्रस्थापित केला आहे. को-विन पोर्टलवर आकडेवारी उपलब्ध करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत एकूण ७९.२५ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी याचं कौतुक केलं आहे. 'आज झालेल्या विक्रीम लसीकरणाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. लसीकरण मोहीम यशस्वी करण्याऱ्या डॉक्टर, प्रशासक, नर्सेस, आरोग्यसेवा आणि सर्व आघाडीच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक करतो. करोनाला हरवण्यासाठी लसीकरणाला प्रोत्साहन देत रहा, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india sets world record of over 2 cr vaccinations in a day on pm modi birthday
PM मोदींच्या वाढदिवसाला करोना लसीचे २.५ कोटी डोस देत भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड


देशात कर्नाटकने सर्वाधिक २६.९ लाख लसीचे डोस दिले, तर बिहारने २६.६ लाखांपेक्षा जास्त डोस दिले. त्याच वेळी, उत्तर प्रदेशात २४.८ लाखांहून अधिक डोस दिले गेले. मध्य प्रदेशात २३.७ लाखांपेक्षा जास्त डोस आणि गुजरातमध्ये २०.४ लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले.

लसीकरण मोहीमेत शुक्रवारी २.५० कोटी डोस देण्यात यश आलं. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट केलं. 'भारताचे अभिनंदन, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी, भारताने आज इतिहास रचला आहे. २.५० कोटीहून अधिक लसीचे डोस देऊन, देश आणि जगाच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय लिहिला गेला आहे. आजचा दिवस हा आरोग्य कर्मचाऱ्यांचे नावे राहिला', असं मांडवीय म्हणाले.

covid vaccination record : रेकॉर्डब्रेक लसीकरण करत भारताने इतिहास रचला; पण लस न घेताच आले धडाधड मेसेज!

भारताला लसीकरणात १० कोटींचा आकडा गाठण्यासाठी ८५ दिवस लागले. यानंतर ४५ दिवसांत २० कोटी डोस दिले. यानंतर २९ दिवसांत ३० कोटी लसीचे डोस देण्याचा टप्पा गाठला. ३० कोटीहून ४० कोटीचा टप्पा गाठण्यात २४ दिवस लागले आणि यानंतर २० दिवसांत ६ ऑगस्टला लसीचे ५० कोटी डोस देण्याचा टप्पा ओलांडला. याच्या १९ दिवसांत ६० कोटींचा टप्पा ओलांडला. यानंतर १३ सप्टेंबरला ७५ कोटी कोटींच्या लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण केले गेले.

महत्वाचे लेख