अ‍ॅपशहर

चीनला इशारा! अमेरिकेसोबत भारत करणार 'हा' मोठा करार

भारत अमेरिकेतील संबंध अधिक दृढ होणार आहेत. देशांत सैन्य स्तरावरील देवाण-घेवाण आणखी वाढणार आहे. यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये करार होणार आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर हे भारत दौऱ्यावर आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Oct 2020, 10:37 pm
नवी दिल्ली: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्या भारत दौर्‍यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक संरक्षण करार होण्याची शक्यता आहे. यात अमेरिकेच्या सैन्य उपग्रहांकडून अचूक डाटा आणि टोपोग्राफिक फोटो भारताला मिळतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india usa
सैन्य उपग्रहांचा डाटा मिळवण्यासाठी अमेरिकेसोबत भारत करणार करार


हा डाटा देण्याचा करार हा बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन एग्रीमेंटचा (BECA) पाया आहे. यापूर्वी दोन्ही देशांनी लष्करी रसदची देवाणघेवाण आणि सुरक्षित संचार सक्षम करण्यासाठी करार केले आहेत.

सोमवारी यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकचे संरक्षणमंत्री एस्पर यांच्या या भेटीदरम्यान बीईसीएवर स्वाक्षरी केली जाईल. यामुळे दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील मैत्री अधिक घट्ट होतील.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारतीय बाजाराकडे दुर्लक्ष करू नका'

हाथरस प्रकरणः सुप्रीम कोर्ट उद्या देणार तीन मुद्द्यांवर निकाल

संरक्षण मंत्र्यांनी सैन्य ते सैन्य सहकार्याच्या मुद्द्यावर द्विपक्षीय संरक्षणाचा आढावा घेतला आणि सुरक्षित संचार प्रणाली आणि माहिती सामायिक आणि सहकार्याच्या संभाव्य नवीन क्षेत्रांवर देखील चर्चा केली. या चर्चेमुळे भारत-अमेरिका संरक्षण संबंध आणि सहकार्यात नवा जोश भरला जाईल, असं राजनाथ सिंह म्हणाले. पुढील महिन्यात होणार्‍या मलबार युद्ध सरावात ऑस्ट्रेलियाच्या सहभागाचंही एस्पर यांनी स्वागत केलं. भारत आणि अमेरिकच्या नौदलातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी १९९२ मध्ये वार्षिक युद्ध सरावाची मालिका सुरू झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज