अ‍ॅपशहर

पाकिस्तानकडून गोळीबार; भारतीय लष्करातील अधिकारी शहीद

पूर्व लडाखमध्ये एकीकडे चीनशी तणाव असताना दुसरीकडे पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा अधिकारी शहीद झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2020, 11:31 pm
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) शहीद झाले. भारतीय जवानांनीही पाकिस्तानी सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan ceasefire violation
पाकिस्तानकडून गोळीबार; भारतीय लष्करातील अधिकारी शहीद ( प्रातिनिधिक फोटो )


राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. बाबाखोरी परिसरात पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय लष्करातील अधिकारी शहीद झाले.

भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांनी आज, सोमवारीच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर हल्ला केला, त्यानंतर काही तासांनी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पुलवामा जिल्ह्यातील पंपोर येथील कंडाल परिसरात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते. तर तीन जवान जखमी झाले. जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना वाढलेल्या आहेत. ऑगस्टच्या अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांत पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील दोन अधिकारी शहीद झाले होते.

कन्हैया कुमारनी केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, म्हणाले...

हाथरस प्रकरणः जातीय दंगली भडकावण्यासाठी बनवली वेबसाइट! युपी पोलीस म्हणाले...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज