अ‍ॅपशहर

दर तिसऱ्या दिवशी जातेय एका रेल्वे कर्मचाऱ्याची नोकरी; कारण वाचून म्हणाल लय भारी

भारतीय रेल्वे देशात रोजगार देण्यात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. संरक्षण क्षेत्रापाठोपाठ सर्वाधिक नोकऱ्या रेल्वेकडून दिल्या जातात. रेल्वेत नोकरी करणं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी लाखो तरुण तरुणी वर्षानुवर्षे मेहनत करतात. परीक्षा देतात. मात्र सध्या रेल्वे दर तीन दिवसांनी एक कर्मचाऱ्याला नारळ देत आहे. रेल्वेकडून सध्या कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2022, 5:55 pm
भारतीय रेल्वे देशात रोजगार देण्यात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. संरक्षण क्षेत्रापाठोपाठ सर्वाधिक नोकऱ्या रेल्वेकडून दिल्या जातात. रेल्वेत नोकरी करणं अनेकांचं स्वप्न असतं. त्यासाठी लाखो तरुण तरुणी वर्षानुवर्षे मेहनत करतात. परीक्षा देतात. मात्र सध्या रेल्वे दर तीन दिवसांनी एक कर्मचाऱ्याला नारळ देत आहे. रेल्वेकडून सध्या कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. गेल्या १६ महिन्यांपासून रेल्वे दर तीन दिवसामागून एका कर्मचाऱ्याला नारळ देत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम railway


बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय रेल्वेनं कामगिरी सुधारण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. गेल्या १६ महिन्यांपासून रेल्वे साधारणत: दर तीन दिवसाला एका कर्मचाऱ्याला कामावरून कमी करत आहे. आतापर्यंत रेल्वेच्या १३९ अधिकाऱ्यांनी वॉलेंट्री रिटायरमेंट घेतली आहे. तर ३८ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं आहे. या कर्मचारी, अधिकाऱ्यांपैकी अनेकांना खराब कामगिरीच्या आधारे काढण्यात आलं आहे. तर काहींची नोकरी भ्रष्टाचार प्रकरणांमुळे गेली आहे.
जंगलात शरीर संबंध ठेवायला लावले, मग फेविक्वीक टाकून संपवले; आता मांत्रिक पोलिसांना म्हणतो...
रेल्वेनं दोन सीनियर ग्रेड अधिकाऱ्यांनादेखील नोकरीवरून काढलं आहे. यातील एका अधिकाऱ्याला सीबीआयनं अटक केली होती. त्याला हैदराबादमध्ये पाच लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली. तर दुसऱ्या अधिकाऱ्याला तीन लाखांची लाच स्वीकारताना रांचीत पकडण्यात आलं.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबद्दल अतिशय स्पष्ट आहे. रेल्वेनं जुलै २०२१ मध्ये दर ३ दिवसाला एका भ्रष्ट कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकलं आहेत, असं रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. भारतीय रेल्वेनं डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगच्या सर्व्हिस नियम ५६ (जे) च्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे. या नियमाच्या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची नोटीस किंवा तीन महिन्यांचा पगार कधीही सेवेतून निवृत्ती देता येऊ शकते किंवा त्यांना कामावरून काढलं जाऊ शकतं.
दहावी नापास तरुणानं दवाखाना उघडला; पाईल्सची ऑपरेशन्स केली; ३६५० जणांवर उपचार केले अन् मग...
कामात सुधारणा करा. अन्यथा व्हीआरएस घ्या, असा इशारा रेल्वे मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांना दिला होता, याकडे रेल्वे अधिकाऱ्यानं लक्ष वेधलं. कामावरून काढण्यात आलेले कर्मचारी इलेक्ट्रिकल, सिग्नलिंग, मेडिकल, स्टोर्स आणि मॅकेनिकल विभागातील आहेत.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज