अ‍ॅपशहर

...अन् 'इंदिरा कँटीन'ला राहुल 'अम्मा' बोलले!

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बेंगळुरूमध्ये 'इंदिरा कँटीन' चे उदघाटन केले. या कॅन्टीनमध्ये नागरीकांना फक्त ५ रुपयात नाश्ता आणि १० रुपयात दिवसा आणि रात्रीही जेवण मिळणार आहे. उदघाटनानंतर राहुल यांनी कँटीनमध्ये जेवणही केलं. यावेळी राज्यातील काँग्रेस सरकारच्या या उपक्रमाबद्दल राहुल यांनी कौतुक केलं.

Maharashtra Times 17 Aug 2017, 12:16 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indira canteen opened in bengluru to provide food in 5 and 10 rupees
...अन् 'इंदिरा कँटीन'ला राहुल 'अम्मा' बोलले!


काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बेंगळुरूमध्ये 'इंदिरा कँटीन' चे उदघाटन केले. या कॅन्टीनमध्ये नागरीकांना फक्त ५ रुपयात नाश्ता आणि १० रुपयात दिवसा आणि रात्रीही जेवण मिळणार आहे. उदघाटनानंतर राहुल यांनी कँटीनमध्ये जेवणही केलं. यावेळी राज्यातील काँग्रेस सरकारच्या या उपक्रमाबद्दल राहुल यांनी कौतुक केलं. पण यावेळी चुकून ते 'इंदिरा कँटीन' ऐवजी ते 'अम्मा कँटीन' बोलून गेले.

'भोजन सर्वांसाठी' या उपक्रमातून राज्यातील काँग्रेस सरकारने आणखी एक संकल्प पूर्ण केला आहे. यामुळे शहरातील मागासलेले आणि गरीब नागरीक आता उपाशी राहणार नाहीत. आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्यांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न नसतो. पण ऑटोरिक्षा चालक, गरीब, मजूर आणि कामगारांकडे पोटभरण्या इतकेही पैसे नसतात. यामुळे अशा गरजू लोकांसाठी 'इंदिरा कँटीन'ची सेवा असेल', असं राहुल गांधी म्हणाले.

Karnataka: Congress VP Rahul Gandhi takes a meal at the newly inaugurated Indira Canteen in Bengaluru. pic.twitter.com/h0agD1V4o5 — ANI (@ANI) August 16, 2017

पहिल्या टप्प्यात १०१ 'इंदिरा कँटीन' सुरू होतील. यानंतर येत्या ऑक्टोबरमध्ये महात्मा गांधींच्या १४८ व्या जयंती दिनी अशा आणखी कँटीन सुरू करण्यात येतील. तामिळनाडूतील प्रसिद्ध 'अम्मा कँटीन'च्या धर्तीवर कर्नाटक सरकारनेही राज्यात 'इंदिरा कँटीनची' योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी सरकारने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढच्या वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या पार्श्वभूमवीर काँग्रेस सरकारच्या या स्वस्त जेवणाच्या योजनेकडे निवडणुकीच्या दृष्टीकोनातून बघितलं जातंय.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज