अ‍ॅपशहर

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ४० हजार लोकांसोबत योगासनं

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रांची येथे ४० हजार लोकांसोबत योगा करणार आहेत. रांचीच्या प्रभात तारा मैदानावर या योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तर योग दिनानिमित्त देशभरातील विविध कानाकोपऱ्यात सुमारे १३ कोटी लोक योगासनं करणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jun 2019, 6:53 am
रांची: आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रांची येथे ४० हजार लोकांसोबत योगा करणार आहेत. रांचीच्या प्रभात तारा मैदानावर या योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तर योग दिनानिमित्त देशभरातील विविध कानाकोपऱ्यात सुमारे १३ कोटी लोक योगासनं करणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम MODI


आज भारतासह संपूर्ण जगात ५ वा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येत आहे. योग दिनानिमित्त क्लायमेट अॅक्शन ही थीम आहे. दिल्लीत ३०० ठिकाणी योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. तर रांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत योग दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे रांचीच्या प्रभात तारा मैदानावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी मोदी ६५ मिनिटं योगा करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे हरियाणाच्या रोहतक येथे होणाऱ्या मेला मैदानावरील योग कार्यक्रमात भाग घेणार आहेत. अरुणाचल प्रदेशात इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीसांनी नदीत उभं राहून योगासनं केली. तर नांदेड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग गुरू रामदेव बाबा यांच्यासोबत योगासनं केली.





महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज