अ‍ॅपशहर

योग म्हणजे निरोगी आयुष्याचा पासपोर्ट: मोदी

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लिंक्डइनवरील फॉलोअर्सना केलं आहे. यासाठी त्यानी योगाच्या फायद्यांची एक मोठी यादीच शेअर केली आहे. गेली चार वर्षे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिन साजरा होत आहे. यंदाचं या दिनाचं हे पाचवं वर्ष आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2019, 9:42 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi-yoga

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लिंक्डइनवरील फॉलोअर्सना केलं आहे. यासाठी त्यानी योगाच्या फायद्यांची एक मोठी यादीच शेअर केली आहे. गेली चार वर्षे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिन साजरा होत आहे. यंदाचं या दिनाचं हे पाचवं वर्ष आहे.

'योग आणि तुम्ही: सुदृढ शरीर, सुदृढ मन' या शीर्षकाखाली पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात योगामुळे त्यांना झालेले फायदे सांगितले आहेत. योगा हा व्यायामापलीकडचा असल्याचं त्यांनी लिहिलं आहे.

ते लिहितात, 'योगा फिटनेस, निरोगी आयुष्याचा पासपोर्ट आहे. हा मीपासून आम्हीपर्यंतचा प्रवास आहे. योगामुळे मन, शरीर आणि बुद्धिमत्ता यांच्यात एक विशिष्ट लय साधली जाते.' योगासनं करणं किती सहज, सोपं आहे, योगासाठी कशी कुठल्याच साधनांची गरज नसते, तेही मोदी यांनी सांगितलं आहे.

अॅनिमेटेड व्हिडिओ

मोदींनी त्यांचे अॅनिमेटेड व्हिडिओदेखील पोस्ट केले आहेत. त्यात त्यांनी विविध आसनं दाखवली आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज