अ‍ॅपशहर

काश्मिरातील इंटरनेट लवकरच पूर्ववत

गेले अनेक महिने इंटरनेट आणि फोन बंद असल्यामुळे संपर्क तुटलेल्या जम्मू-काश्मीरमधील दळणवळण लवकरच पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचे सल्लागार केवलकुमार शर्मा यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र टाइम्स 18 Feb 2020, 9:52 am
बंगळुरू : गेले अनेक महिने इंटरनेट आणि फोन बंद असल्यामुळे संपर्क तुटलेल्या जम्मू-काश्मीरमधील दळणवळण लवकरच पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांचे सल्लागार केवलकुमार शर्मा यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम काश्मीरमध्ये इंटरनेट


सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार दर आठवड्याला प्रशासनाच्या बैठका होत आहेत. निर्बंध कमी करण्याबाबत त्यात चर्चा होत असून परिस्थिती सुधारत असल्याचे शर्मा म्हणाले. येत्या काही महिन्यांत हे निर्बंध सैल करणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. मे महिन्यात होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेसाठीच्या पूर्वतयारीसाठी जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधी म्हणून शर्मा इथे आले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज