अ‍ॅपशहर

मेहबुबा मुफ्ती 'भारत माता की जय' बोलतील का?

'भारत माता की जय' या घोषणेवरून सुरू झालेल्या वादात आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही उडी घेतली आहे. भाजप आणि पीडीपीमध्ये सत्तेसाठी पुन्हा जुळवाजुळव सुरू झाल्यानं अस्वस्थ झालेल्या अब्दुल्ला यांनी दोन्ही पक्षांमध्ये 'काडी' टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मेहबुबा मुफ्ती 'भारत माता की जय' बोलतील का, असा खोचक सवाल अब्दुल्ला यांनी भाजपला केला आहे.

Maharashtra Times 18 Mar 2016, 11:32 am
मटा ऑनलाइन वृत्त । जम्मू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम is mehbooba mufti also going to be asked to chant bharat mata ki jai
मेहबुबा मुफ्ती 'भारत माता की जय' बोलतील का?

'भारत माता की जय' या घोषणेवरून सुरू झालेल्या वादात आता जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही उडी घेतली आहे. भाजप आणि पीडीपीमध्ये सत्तेसाठी पुन्हा जुळवाजुळव सुरू झाल्यानं अस्वस्थ झालेल्या अब्दुल्ला यांनी दोन्ही पक्षांमध्ये 'काडी' टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मेहबुबा मुफ्ती 'भारत माता की जय' बोलतील का, असा खोचक सवाल अब्दुल्ला यांनी भाजपला केला आहे.

मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर जम्मू-काश्मीरमध्ये अद्याप नवीन सरकारची स्थापना झालेली नाही. मेहबुबा यांनी भाजपपुढं नव्या अटी ठेवल्यानं पेच निर्माण झाला आहे. दोन्हीकडून बरेच दिवस काहीच हालचाली होत नसताना काल अचानक मेहबुबा यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर अब्दुल्ला यांनी दोन्ही पक्षांना डिवचणारं ट्विट केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनविण्यासाठी भाजपवाले मेहबुबा मुफ्ती यांना 'भारत माता की जय' बोलण्याची अट घाततील का, अशी विचारणा ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

गळ्यावर सुरी ठेवली तरी 'भारत माता की जय' बोलणार नाही, असं वक्तव्य एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये केलं होतं. त्यावरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपसह हिंदुत्ववादी पक्षांनी ओवेसींवर टीकेची झोड उठवली आहे. त्याचाच संदर्भ देत अब्दु्ल्ला यांनी भाजपला चिमटा काढला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज