अ‍ॅपशहर

भाजपमध्ये नवे पर्व! मोदींचे विश्वासू जे. पी. नड्डा राष्ट्रीय अध्यक्षपदी

भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची निवड झाली आहे. प्रथेप्रमाणे सर्वसहमतीनं त्यांची निवड झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंह यांनी तशी घोषणा केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jan 2020, 3:32 pm
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची निवड झाली आहे. प्रथेप्रमाणे सर्वसहमतीनं त्यांची निवड झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंह यांनी तशी घोषणा केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jp-nadda


अध्यक्षपदासाठी खुद्द अमित शहा यांनी नड्डा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यास सहमती असल्यानं नड्डा यांची निवड ही केवळ औपचारिकता उरली होती. ती पूर्ण झाली. संघटन कुशल असलेले नड्डा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व मोदींच्याही जवळचे मानले जातात. त्यांच्या निवडीत हा घटकही महत्त्वाचा ठरल्याचं बोललं जात आहे.

वाचा: कोण आहेत जगत प्रकाश नड्डा? पाहा कारकीर्द

नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यानंतर त्यांचे खास विश्वासू असलेले अमित शहा यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं अनेक राज्यांत सत्ता मिळवली. अलीकडच्या काळात काही राज्ये गमवावी लागली असली तरी शहा यांची पक्षसंघटनेवर मजबूत पकड राहिली. मोदींच्या नव्या सरकारमध्ये त्यांची गृहमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर नड्डा यांची कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी लागली होती. तेव्हाच त्यांच्याकडं भविष्यात मोठी जबाबदारी येणार, असं मानलं जात होतं. तो अंदाज खरा ठरला आहे. लो प्रोफाइल व स्वच्छ प्रतिमेच्या नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष दमदार वाटचाल करेल, असा विश्वास ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.

वाचा: आता RSSच्या अजेंड्यावर लोकसंख्या नियंत्रण

वाचा: पंतप्रधान मोदींनी नागरिकत्वाचा पुरावा द्यावाः RTI

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज