अ‍ॅपशहर

जयपूरमध्ये महिलेनं दिला पाच बालकांना जन्म

राजस्थानच्या जयपूरमधील एका महिलेनं एकाचवेळी पाच बालकांना जन्म दिला. एका नवजात बालकाचा जन्मताच मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, तीन नवजात बालकांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तर एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Oct 2019, 4:37 pm
जयपूर: राजस्थानच्या जयपूरमधील एका महिलेनं एकाचवेळी पाच बालकांना जन्म दिला. एका नवजात बालकाचा जन्मताच मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, तीन नवजात बालकांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तर एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new-born-baby


जयपूरमधील सांगानेर येथील महिला रुखसाना हिनं जनाना रुग्णालयात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता एकाचवेळी पाच मुलांना जन्म दिला. तिघांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. तर एका मुलाचा जन्मताच मृत्यू झाला होता. तर एका मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. लता राजौरिया यांनी सांगितलं की, 'रुखसानाची प्रकृती स्थिर आहे. एका बालकाचा जन्मताच मृत्यू झाला आहे. चार नवजात बालकांना एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यातील एकाचा व्हेंलिलेटरवर ठेवलं आहे.'

महिलेची वेळेआधीच प्रसूती झाल्यानं सर्व बालकांचं वजन कमी आहे. त्यामुळं सर्व नवजात बालकांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यात दोन मुली आणि दोन मुलं आहेत. जन्मताच मृत्यू झालेला नवजात मुलगा होता. सर्व बालकांचे वजन एक ते १.४ किलो होते. वजन कमी असल्यानंच त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.

ठाणे स्थानकात वनरुपी क्लिनिकमध्ये प्रसूती

धावत्या लोकलमध्ये जन्मली मुलगी

ऑस्ट्रेलियात २२ पुरुषांनी दिला बाळांना जन्म!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज