नवी दिल्ली : 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती उपराष्ट्रपती कार्यालयाने शनिवारी दिली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी 'एम्स'मध्ये जाऊन जेटली यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर उपराष्ट्रपती कार्यालयाने वरील माहिती दिली आहे. श्वास घेताना त्रास होत असल्याने जेटली यांना शुक्रवारी 'एम्स'च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जेटलींच्या शरिरातील रक्तप्रवाह, हृदयक्रिया सामान्य आहे.
जेटली यांची प्रकृती स्थीर
'एम्स'मध्ये दाखल करण्यात आलेले माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती उपराष्ट्रपती कार्यालयाने शनिवारी दिली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Aug 2019, 4:00 am