अ‍ॅपशहर

जल्लिकट्टू विधेयक: तामिळनाडू विधानसभेत मंजूरी

तामिळनाडू विविध ठिकाणी जल्लिकट्टूसाठी आंदोलन सुरू असतानाच तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात जल्लिकट्टू विधेयकाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जल्लिकट्टू खेळाचे आयोजन कायदेशीर ठरणार आहे.

Maharashtra Times 23 Jan 2017, 5:44 pm
मटा ऑनलाइन वृत्त । चेन्नई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jallikattu bill passed in tamilnadu assembly
जल्लिकट्टू विधेयक: तामिळनाडू विधानसभेत मंजूरी


तामिळनाडू विविध ठिकाणी जल्लिकट्टूसाठी आंदोलन सुरू असतानाच तामिळनाडू विधानसभेच्या विशेष सत्रात जल्लिकट्टू विधेयकाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जल्लिकट्टू खेळाचे आयोजन कायदेशीर ठरणार आहे.

तामिळनाडूचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी शनिवारी जल्लिकट्टू अध्यादेशाला मंजूरी दिली होती. त्यानंतर जल्लिकट्टूचे आयोजन करण्यात आले. मात्र, जल्लिकट्टूवर कायमस्वरुपी तोडगा काढवा यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू होते. नव्या जल्लिकट्टू विधेयकानुसार जल्लिकट्टूवर सीसीटीव्हीची देखरेख असणार आहे.

दरम्यान, जल्लिकट्टूचे आयोजन करण्याच्या मागणीसाठी चेन्नईतील मरीना बीचवर काही दिवसांपासून आदोलन सुरू आहे. या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आज सकाळीच कारवाई सुरू केली. पण मानवीसाखळी बनवत आंदोलकांनी पोलिसांना विरोध केला. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करत त्यांना हटवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी लाठीमार केल्याने आंदोलक चिडले आणि त्यांनी मरीना बीचजवळ असलेल्या आईस हाऊस पोलीस ठाण्यावर हल्ला केला. त्याशिवाय अनेक गाड्यांचीही आंदोलकांनी जाळपोळ केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज