अ‍ॅपशहर

काश्मीर: लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला

सीमेपलीकडून सुरू असलेल्या छुप्या युद्धाची जबर किंमत आज भारताला मोजावी लागली. जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १७ जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात चार दहशतवादी मारले गेले आहेत. हल्ल्यानंतर लष्कराच्या विशेष कमांडोंनी मुख्यालयाचा ताबा घेतला असून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

Maharashtra Times 18 Sep 2016, 12:12 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जम्मू-कश्मीर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम terror attack at army headquarters in jammu and kashmirs uri
काश्मीर: लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला


सीमेपलीकडून सुरू असलेल्या छुप्या युद्धाची जबर किंमत आज भारताला मोजावी लागली. जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १७ जवान शहीद तर, १९ जखमी झाले आहेत. लष्कराच्या प्रतिहल्ल्यात चार दहशतवादी मारले गेले आहेत. हल्ल्यानंतर लष्कराच्या विशेष कमांडोंनी मुख्यालयाचा ताबा घेतला असून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.

नियंत्रण रेषेला लागून असलेल्या बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्कराचे हे मुख्यालय आहे. याच मुख्यालयाला दहशतवाद्यांनी पहाटे लक्ष्य केले. गोळीबार करतानाच दहशतवाद्यांनी हँडग्रेनेडही फेकले. ही चकमक सुमारे पाच तास सुरू होती. त्यात लष्कराच्या १७ जवानांना जीव गमवावा लागला. तर, लष्करानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार दहशतवादी ठार झाले.

या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका व रशियाचा पूर्वनियोजित दौरा पुढं ढकलला असून काश्मीरमधील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर हे सुद्धा बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह उरीच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

17 soldiers have lost their lives and four terrorists gunned down in Uri (J&K) Encounter. (Visuals deferred) pic.twitter.com/6Ja2hr86Bw — ANI (@ANI_news) September 18, 2016

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज