अ‍ॅपशहर

अंधार चिरणारे डोळे अन् चाहुल घेणारे कान!

सामान्य माणसाला अंधारातून चालताना उजेडाची मदत घेण्यावाचून पर्याय नसतो पण आपल्या जवानांची तीक्ष्ण नजरच त्यांच्या उजेडाचा स्रोत असतो...

पूनम पाण्डे | Maharashtra Times 26 Jul 2018, 2:29 am
जम्मू : सामान्य माणसाला अंधारातून चालताना उजेडाची मदत घेण्यावाचून पर्याय नसतो. पण आपल्या जवानांची तीक्ष्ण नजरच त्यांच्या उजेडाचा स्रोत असतो. प्रकाशाची मदत घेतल्यास शस्त्रूच्या गोळीचे लक्ष्य होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यांनीच अंधाराला चिरत या जवानांना खडा पहारा द्यायचा असतो. यात कानांची भूमिकाही तितकीच महत्त्वपूर्ण असते. स्वत: किंचितही आवाज न करता शस्त्रूच्या हालचालींचा वेध त्यांचे कान घेत असतात. अंधारातून न डगमगता, विश्वासानं मार्गाक्रमण करण्याची किमया प्रशिक्षणातून आलेली असते. कारण एखादा जवान सुट्टीवरून परतला तर त्याला आठवडाभर पूर्ण प्रशिक्षण दिलं जातं. वाटेत कुठं दगड किंवा खड्डा आहे, याचा अचूक अंदाज या जवानांना असतो. एखादा दगड जागेवरून जराही हलला असेल, अथवा गवत दबले असेल तर त्या ठिकाणी कुणीतरी दुसरंही उपस्थित असल्याचा सुगावा त्यांना सहज लागतो. मग विशिष्ट सांकेतिक आवाजानं आपल्या साथीदारांना सूचित केलं जातं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jammu-kashmir-LOC


गटागटानं पहारा

गटागटानं नियंत्रण रेषेवर पहारा दिला जातो. प्रत्येकाला आपल्या साथीदाराची इतकी सवय असते की, अंधारात त्याच्याव्यतिरिक्त अन्य कोणाची उपस्थिती असल्यास केवळ हालचालींवरून तत्काळ लक्षात येतं. गस्तीवर जाताना प्रत्येकाकडं एक शस्त्र असतं. तसेच प्रत्येक पथकाकडं ग्रेनेड आणि रॉकेट लाँचर असतं. या पथकातल्या एका जवानाकडं हे वजनदार शस्त्र असतं, तर दुसऱ्याकडं त्याची सामुग्री. अशाप्रकारे एकमेकांना साथ देत, दक्षपणे त्यांचा पहारा अखंड सुरू असतो.

तत्काळ होतो का गोळीबार?

कोणतीही संशयास्पद व्यक्ती दिसली की तत्काळ गोळीबार केला जात असेल का? तर मुळीच नाही. प्रशिक्षणापासून तशी सूचना असते. समोरून येणाऱ्याच्या हालचालींचा पूर्ण अंदाज येत नाही, तोपर्यंत गोळी चालवायची नसते. कारण कदाचित तो आपल्याच दुसऱ्या तुकडीतील सैनिक किंवा नागरिक असू शकतो. मोठे शस्त्र सोडच, स्वत:जवळील शस्त्रातून फायर करण्यापूर्वीही कमांडरच्या आदेशाची वाट पाहणं ही शिस्त अतिशय बिकट स्थितीतही पाळली जाते.

विविध प्रकारच्या मोहिमा

दिवस असो वा रात्र, गस्तीवर जाण्यापूर्वी कामांडर आपल्या पथकाला सूचना (ब्रीफ) देतो, तर संपूर्ण परिसर तपासून आल्यानंतरही त्यावर चर्चा (डीब्रीफिंग) होते. तळाच्या आजूबाजूच्या परिसरातील गस्त, नियंत्रण रेषेवरील गस्त, अचानक केलेली तपासणी किंवा शोधमोहीम अशा वेगवेगळ्या पद्धतीनं हे जवान सीमेचं व पर्यायानं देशाचं रक्षण करत असतात. अर्थात, गस्तीची निश्चित वेळ असते. कारण शस्त्रूला अंदाज येऊन जिवावर बेतण्याची शक्यता असते.

तारांच्या कुंपणाची मदत

गस्त किंवा तपास मोहिमांसह तारांच्या कुंपणाची घुसखोरी रोखण्यासाठी फारच मदत होते. या कुंपनात तारांचे चार स्तर असतात व ते सहा फूट उंच असते. त्यामुळे कोणी त्यात घुसू शकत नाही. कोणी या तारा कापण्याचा प्रयत्न केल्यास किमान ३५ ते ४० मिनिटं लागतात. तोपर्यंत जवानांचं एखादं पथक तिथं नक्कीच पोहोचतं. काही ठिकाणी तर या तारांमध्ये वीजप्रवाह सोडलेला असतो.

जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा किंवा बर्फवृष्टी असो, आपले जवान प्रत्येक ऋतूत तितक्याच धैर्यानं सीमेवर पाहारा देत असतात. देश सुरक्षित ठेवण्यासह शस्त्रूचे मनसुबे उधळून लावणं हेच त्याचं लक्ष्य असतं.


लेखकाबद्दल
पूनम पाण्डे
पूनम पाण्डे नवभारत टाइम्स में असिस्टेंट एडिटर हैं। वह बीजेपी, आरएसएस और राष्ट्रीय सुरक्षा के मामले कवर करती हैं।... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज