अ‍ॅपशहर

gallantry award : शहीद मुलाचे शौर्यचक्र स्वीकारताना आई गहिवरली, राजनाथ सिंहांनी धीर दिला

राष्ट्रपती भवनात शूरवीर जवानांचा त्यांच्या अतुलनीय पराक्रमाबद्दल गौरव करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे पुरस्कार दिले. जम्मू-काश्मीरमधील शहीद पोलीस अधिकारी बिलाल मागरे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2021, 7:52 pm
नवी दिल्लीः जम्मू आणि काश्मीरचे एसपीओ बिलाल अहमद मागरे यांना ( gallantry award winners 2021) मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे शौर्यचक्र प्रदान केले गेले. बिलाल अहमद यांची आई सारा बेगम यांनी मुलाचा शौर्य चक्र पुरस्कार स्वीकारला. यावेली सारा बेगम भावूक झाल्या आणि त्यांचा श्वास वेगाने सुरू झाला. हे पाहून आधी तिथे उपस्थित महिला कॉन्स्टेबलने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार दिला. त्यानंतर सारा बेगम पुरस्कार घेऊन परतत असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे सांत्वन केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jammu and kashmir spo bilal ahmad magray awarded shaurya chakra posthumously
शहीद मुलाचे शौर्यचक्र स्वीकारताना आई गहिवरली, राजनाथ सिंहांनी धीर दिला


बिलाल अहमद मागरे हे जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. २० ऑगस्ट २०१९ ला सुरक्षा दलांना बारामुल्ला येथील एका घरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संयुक्त वेढा घालून शोध मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे सामान्य नागरिकही घरात अडकून पडले होते. अशा परिस्थितीत बिलाल स्वेच्छेने या मोहिमेत सहभागी झाले. जिवाची पर्वा न करता ते नागरिकांना तिथून बाहेर काढत होते. यावेळी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेडने हल्ला केला आणि बेछुट गोळीबार केला.

prakash jadhav award kirti chakra : अभिमानाने उर भरून येईल असा पराक्रम... प्रकाश जाधव यांना मरणोत्तर

दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही बिलाल अहमद मगरे यांनी तेथील दहशतवाद्यांशी मुकाबला केला आणि एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे ते शहीद झाले.

abhinandan varthaman : अभिनंदन यांना वीरचक्र, चहाचा उल्लेख करत पाकिस्तानचा जळफळाट

महत्वाचे लेख