अ‍ॅपशहर

सीमेवर पाकचा गोळीबार, तीन नागरिक ठार

कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाकने केलेल्या गोळीबारात सीमेला लागून असलेल्या गावातील तीन जण ठार झाले. यात एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. पुंछ जिल्ह्यातील मेंढर आणि बालाकोट सेक्टरमध्येही पाकिस्तानी सैन्याने तोफ गोळ्यांचा मारा केला. छोट्या शस्त्रांनीही गोळीबार केला. पाकच्या याला गोळीबाराला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Apr 2020, 10:49 pm
श्रीनगरः पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तीन नागरिक ठार झाले. याशिवाय पुंछ जिल्ह्यातील बालाकोट आणि मेंढर सेक्टरमध्येही पाककडून गोळीबार केला गेला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shelling by Pakistan in  Kupwara

कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाकने केलेल्या गोळीबारात सीमेला लागून असलेल्या गावातील तीन जण ठार झाले. यात एक महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. पुंछ जिल्ह्यातील मेंढर आणि बालाकोट सेक्टरमध्येही पाकिस्तानी सैन्याने तोफ गोळ्यांचा मारा केला. छोट्या शस्त्रांनीही गोळीबार केला. पाकच्या याला गोळीबाराला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं.

शनिवारी रात्रीही गोळाबार केला

पाकिस्तानी सैन्याने शनिवारी रात्रीही गोळीबार केला होता. यात महिला जखमी झाली होती. या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिची प्रकृती आता स्थिर आहे. बालाकोटसह मेंढर सेक्टरमध्येही गोळीबार केला गेला होता.

पाकिस्तानच्या गोळीबारात अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे. जम्मूतील कठुआ जिल्ह्यात सीमेवर हिरानगर सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सनी आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये रात्रभर गोळीबार सुरू होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

डॉक्टरांनी पोलिसाचा कापलेला हात पुन्हा जोडला

महिलेने पोटच्या ५ मुलांना गंगा नदीत फेकले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज