अवंतीपोरा : जम्मू काश्मीरमध्ये मोठा घातपात घडवून आणण्याचा एक मोठा दहशतवादी घट सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आलाय. काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात मोठ्या प्रमाणात आयईडी (Improvised Explosive Device) जप्त करण्यात आले आहेत. कोणत्याही नुकसानीशिवाय ही स्फोटकं निष्क्रीय करण्यात बॉम्बविरोधी पथकाला यश मिळालंय. रेल्वे रोड डोगरी पोरा भागाला पंजगाम गावाला जोडणाऱ्या रस्त्याच्या बाजुला आयईडीसारख्या वस्तू सापडल्याची गुप्त सूचना सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर अवंतीपोरा पोलीस, सेनेची ५५ राष्ट्रीय रायफल्स (55 RR) आणि सीआरपीएफच्या १८५ बटालियनच्या संयुक्त टीमनं या भागाला घेराव घातला. नागरिकांना सुरक्षितता सुनिश्चित करून ही स्फोटकं ताब्यात घेण्यात आली.
तपासा दरम्यान १० लीटर क्षमतेचा एक संशयित कंटेनर सुरक्षा यंत्रणेच्या हाती लागला होता. यामध्येच, आयईडी भरण्यात आल्याचं जवानांच्या लक्षात आलं. त्यानंतर मोठ्या प्रयत्नांनी हे आयईडी घटनास्थळीच निष्क्रीय करण्यात आले. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळलीय. आयईडीचा स्फोट झाला असता तर या भागातील अनेक रहिवाशांना आपले प्राण गमवावे लागले असते.
या प्रकरणी अवंतीपोरा पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे.
उल्लेखनीय म्हणजे, अशी घटना दोन आठवड्यांपूर्वीही घडली होती. दक्षिण पुलवामा जिल्ह्यात १० किलोची स्फोटकं जप्त करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून हा कट रचण्यात आला होता.