श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अवंतीपोरा भागातील बंदिपोरा-रिंझिंपोरा परिसरात दहशवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी शुक्रवारी सकाळी या भागात शोधमोहिम राबवली. दहशतवाद्यांना याची कुणकुण लागताच शोध मोहिमेचे रूपांतर चकमकीत झाले. या वेळी जवानांना एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. मृत दहशतवाद्याची ओळख पटली असून, त्याचे नाव इश्फाक युसूफ वानी असे आहे. तो पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी आहे, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुलवामामध्ये दहशतवाद्याला कंठस्नान
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अवंतीपोरा भागातील बंदिपोरा-रिंझिंपोरा परिसरात दहशवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.
महाराष्ट्र टाइम्स 29 Dec 2018, 4:00 am