अ‍ॅपशहर

मानवेंद्र सिंग, आशीष देशमुख यांचा काँग्रेस प्रवेश

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचे पुत्र आमदार मानवेंद्र सिंग यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे महासचिव अशोक गेहलोत, राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सचिन पायलट आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत मानवेद्र सिंग यांनी पक्षप्रवेश केला. राजस्थानच्या बाडमेर भागात प्रभाव असलेले मानवेंद्र सिंग यांच्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आशीष देशमुख यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Oct 2018, 8:23 pm
नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम manvendra-singh


माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंग यांचे पुत्र आमदार मानवेंद्र सिंग यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे महासचिव अशोक गेहलोत, राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सचिन पायलट आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत मानवेद्र सिंग यांनी पक्षप्रवेश केला. राजस्थानच्या बाडमेर भागात प्रभाव असलेले मानवेंद्र सिंग यांच्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आशीष देशमुख यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशमुख हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख याचे पुत्र आहेत.

काँग्रेसप्रवेशापूर्वी सिंग यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मानवेंद्र सिंग आणि आशीष देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. देशात फक्त दोन लोकांचे (नरेंद्र मोदी आणि अमित शहा) शासन सुरू आहे. भाजपत लोक त्रस्त आहेत. भाजपमधील अनेक नेते काँग्रसमध्ये येऊ इच्छितात असे म्हणत गेहलोत यांनी दोघांचे पक्षात स्वागत केले.

गेहलोत यांनी आरोप करताना पुढे म्हटले की, जसवंत सिंग यांचा भाजपने अपमान केला आहे. जसवंत सिंग हे देशाचे संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र मंत्री होते. ते पंतप्रधानपदाच्या योग्यतेचे होते.

आपण सकाळी राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी माझे स्वागत केले असे मानवेंद्र सिंग प्रतिक्रिया देताना म्हणाले. माझ्यासह बरेच लोक दीर्घ काळापासून संघर्ष करत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये आता मोठे परिणाम पहायला मिळतील, असेही मानवेंद्र म्हणाले.

काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आशीष देशमुख यांनीही पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल भ्रष्टाचाराचा मुद्दा हाती घेतला आहे. हा मोठा भ्रष्टाचार आहे. आता नरेंद्र (मोदी) यांच्यासोबत देवेंद्र (फडणवीस) यांनाही सत्तेवरून पायउतार व्हावे लागणार आहे असे देशमुख म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज