अ‍ॅपशहर

खा. राजू शेट्टींना न घेताच विमानाचं 'जेट सेट गो'

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यासोबत झालेला वाद शमतो न शमतो, तोच त्यात आता आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आज 'जेट एअरवेज'चा फटका बसला. बोर्डिंग पास असूनही राजू शेट्टी यांना न घेताच जेट एअरवेजच्या विमानाने उड्डाण केल्याचा प्रकार आज मुंबई विमानतळावर घडला. या चुकीबद्दल जेटनं दिलगिरी व्यक्त केली नाहीच, उलट पुढच्या विमानाच्या तिकिटासाठी राजू शेट्टींकडून अधिकचे पैसे घेतले. त्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Maharashtra Times 14 Jun 2017, 2:42 pm
मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jet airways flew without raju shetty
खा. राजू शेट्टींना न घेताच विमानाचं 'जेट सेट गो'

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांचा एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यासोबत झालेला वाद शमतो न शमतो, तोच त्यात आता आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आज 'जेट एअरवेज'चा फटका बसला. बोर्डिंग पास असूनही राजू शेट्टी यांना न घेताच जेट एअरवेजच्या विमानाने उड्डाण केल्याचा प्रकार आज मुंबई विमानतळावर घडला. या चुकीबद्दल जेटनं दिलगिरी व्यक्त केली नाहीच, उलट पुढच्या विमानाच्या तिकिटासाठी राजू शेट्टींकडून अधिकचे पैसे घेतले. त्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राजू शेट्टी हे आज सकाळी मुंबईहून दिल्लीला जात होते. जेट एअरवेजचं बिझनेस क्लासचं तिकीट त्यांनी काढलं होतं. विमान उड्डाणाच्या तासभर आधीच ते विमानतळावर पोहोचले होते. विमानतळावर त्यांनी बोर्डिंग पासही घेतला होता. मात्र, प्रवासाला वेळ असल्याने शेट्टी लाउन्जमध्ये येऊन बसले. बराच वेळ होऊनही विमान उड्डाणाबाबत काहीच सूचना न मिळाल्यानं त्यांनी बाहेर येऊन चौकशी केली. तेव्हा, विमानाचं उड्डाण झाल्याचं त्यांना समजलं. तरीही, त्यांनी शांतपणे जेट अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पुढच्या विमानानं दिल्लीपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी केली. त्यावर, जेटनं आपली चूक नसल्याचा आव आणला. राजू शेट्टींची दिल्लीला जायची व्यवस्था त्यांनी केली, पण त्यासाठी दोन हजार रुपये अधिक मागितले. तेव्हा मात्र, राजू शेट्टी चांगलेच संतापले. त्यांनी अधिकचे पैसे भरण्यास नकार दिला. त्यानंतरही जेट एअरवेज आपल्या भूमिकेवरून मागे हटलं नाही. जेट एअरवेजची यात कोणतीच चूक नसल्याचा दावा अधिकारी करत आहेत.

अखेर, दिल्लीतील बैठकीला जाणं महत्त्वाचं असल्याने शेट्टी यांना अधिकचे पैसे भरून प्रवास करावा लागला. या सर्व मनस्तापाची तक्रार विमानतळ प्रशासनाकडे करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज