अ‍ॅपशहर

हरभजनने घेतली वर्णद्वेषी पायलटची विकेट!

जेट एअरवेज कंपनीने भारतीयांबद्दल वर्णद्वेषी शेरेबाजी करणाऱ्या परदेशी पायलटचा सेवेतून निलंबित केले आहे. या पायलटचा उद्दामपणा क्रिकेटपटू हरभजन सिंगने ट्विटरच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला होता. या पायलटवर कठोर कारवाईसाठी हरभजनने पंतप्रधानांकडे मागणी केली होती. हरभजनच्या या 'भेदक' माऱ्याने अखेर संबंधित पायलट 'आऊट' झाला आहे.

Maharashtra Times 26 Apr 2017, 10:32 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jet airways suspends pilot over racism assault claims
हरभजनने घेतली वर्णद्वेषी पायलटची विकेट!

जेट एअरवेज कंपनीने भारतीयांबद्दल वर्णद्वेषी शेरेबाजी करणाऱ्या परदेशी पायलटचा सेवेतून निलंबित केले आहे. या पायलटचा उद्दामपणा क्रिकेटपटू हरभजन सिंगने ट्विटरच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला होता. या पायलटवर कठोर कारवाईसाठी हरभजनने पंतप्रधानांकडे मागणी केली होती. हरभजनच्या या 'भेदक' माऱ्याने अखेर संबंधित पायलट 'आऊट' झाला आहे.

जेटच्या विमानात बेर्न्ड हॉसलिन या पायलटने एका महिला प्रवाशावर वर्णद्वेषी शेरेबाजी करून तिला मारहाण केली होती. एका अपंग व्यक्तीलाही त्याने धक्काबुक्की केली होती. याबाबत ट्विट करून हरभजनने कठोर कारवाईची मागणी केली होती. हरभजनच्या ट्विटने जेट व्यवस्थापन हादरलं. त्यानंतर वेगाने चक्रं फिरली आणि संबंधित पायलटला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

३ एप्रिल रोजी चंदीगड-मुंबई विमानात हा सगळा प्रकार घडला होता. त्याबाबत जेटने खेद व्यक्त केला आहे. संबंधित पायलटला घटनेच्या दिवसापासूनच रोस्टरवरून हटवण्यात आले आहे, असे कंपनीने स्पष्ट केले असून कोणत्याही कर्मचाऱ्याचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही, असेही नमूद केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज