अ‍ॅपशहर

छापेमारीत पोलिसांनी नवजात बाळाला चिरडले, चार दिवसांच्या अर्भकाचा मृत्यू, सहा जणांवर गुन्हा

Jharkhand Crime : पहाटेच्या सुमारास काही पोलीस कर्मचारी दोघा आरोपींना अटक करण्यासाठी एका घरात गेले होते, या छापेमारीच्या वेळी त्यांनी चार दिवसांच्या अर्भकाला बुटाखाली चिरडल्याचा आरोप आहे.

Authored byअनिश बेंद्रे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Mar 2023, 3:13 pm
रांची : छापेमारी करताना पोलिसांच्या बुटाखाली चिरडल्यामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला. चार दिवसांच्या बाळाच्या मृत्यूनंतर सहा पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, तर त्यापैकी पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jharkhand Giridih Infant Baby Dies 900
झारखंडमध्ये पाच दिवसांच्या बाळाचा बुटाखाली चिरडल्याने मृत्यू


शवविच्छेदन अहवालात चार दिवसांच्या अर्भकाच्या अंतर्गत अवयवांना धक्का पोहोचल्याचा (rupture of the spleen) उल्लेख केल्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला. "गिरिडीहातील देवरी पोलिस ठाण्यातील संगम पाठक आणि एस के मंडल या दोन अधिकार्‍यांसह सहा पोलिसांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे" अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

देवरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या कोशोडिंगी गावात बुधवारी पहाटेच्या सुमारास काही पोलीस कर्मचारी दोघा जणांना अटक करण्यासाठी एका घरात गेले होते, या छापेमारीच्या वेळी तान्हुल्याला चिरडल्याची घटना घडल्याचा आरोप आहे.

तीन ग्लास, पाण्याची बॉटल न् अर्धवट खाल्लेला वडापाव; पण मृतदेहाची ओळख पटली 'त्या' खुणेने
गिरिडीहचे पोलिस अधीक्षक अमित रेणू यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत चार दिवसांच्या मुलाला पोलिसांनी बुटाखाली चिरडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. मात्र बाळाच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमा आढळल्या नसल्याचं रेणू यांनी सांगितलं होतं. आरोपी हा मृत बाळाचा आजोबा आहे.


“आज पहाटे 3 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पोलीस आल्यावर मी पळून गेलो. माझ्या कुटुंबातील इतर सदस्यही बाहेर गेले. माझा चार दिवसांचा नातू एका खोलीत बेडवर झोपला होता. पोलीस मला शोधत बेडपाशी आले आणि त्यांनी चिमुकल्याला तुडवलं. जेव्हा माझे कुटुंबीय नंतर खोलीत गेले तेव्हा त्यांनी बाळाला मृतावस्थेत पाहिलं” असं आरोपी भूषण पांडे म्हणाल्याचं वृत्त आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत चौकशीचे आदेश दिले होते.

लेखकाबद्दल
अनिश बेंद्रे
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा 'मास्टरमाईंड' | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव... आणखी वाचा

महत्वाचे लेख