अ‍ॅपशहर

पाकच्या गोळीबारात २ जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. या गोळीबारात एका नागरिकालाही जीव गमवावा लागला आहे. जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. या गोळीबारात एका नागरिकालाही जीव गमवावा लागला आहे.

Maharashtra Times 12 Oct 2017, 8:48 pm
मटा ऑनलाइन वृत्त । जम्मू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jk 2 soldier and 1 civilian lost their lives in ceasefire violation by pak in poonch
पाकच्या गोळीबारात २ जवान शहीद


जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. या गोळीबारात एका नागरिकालाही जीव गमवावा लागला आहे.

नियंत्रण रेषेजवळ कृष्णाघाटी सेक्टरमध्ये आज सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी स्वयंचलित शस्त्रांच्या साह्याने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यात दोन जवान शहीद झाल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली. पाकिस्तानच्या गोळीबाराला तत्काळ प्रत्युत्तर देण्यात आलं असून या भागात अधूनमधून गोळीबार सुरूच आहे, अशी माहिती मिळाली आहे.

टी. के. रेड्डी आणि मोहम्मद झहीर अशी शहीद जवानांची नावे आहेत. लष्कराच्या नॉदर्न कमांडच्या ट्विटर अकाउंटवरून एका ट्विटद्वारे या वीर जवानांना सलाम करण्यात आला आहे.

दरम्यान, पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असून २ ऑक्टोबर रोजी पूंछ भागात गोळीबारात ३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. ३ ऑक्टोबर रोजी भीमबेर सेक्टरमध्येही गोळीबारात एका जवानाला वीरमरण आले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१७ मध्ये सप्टेंबरपर्यंत पाकिस्तानने ६०० पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज