अ‍ॅपशहर

बिहारमध्येही पत्रकारावर गोळ्या झाडल्या

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरूत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज बिहारमध्येही बाइकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी एका पत्रकारावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात हा पत्रकार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

Maharashtra Times 7 Sep 2017, 10:33 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पाटणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम journalist shot by 2 bike borne assailants in bihars arwal condition critical
बिहारमध्येही पत्रकारावर गोळ्या झाडल्या


ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरूत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आज बिहारमध्येही बाइकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी एका पत्रकारावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात हा पत्रकार गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

बिहारमधील अरवल जिल्ह्यातील पालनवा पुलाजवळ ही घटना घडली. पंकज मिश्रा (४०) असे या पत्रकाराचे नाव असून तो राष्ट्रीय सहारा वृत्तपत्रासाठी काम करतो. मिश्रा बँकेतून एक लाख रुपयांची रोकड काढून गावाकडे जात असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला व त्यांच्याकडील रोकडही लुटण्यात आली.

दरम्यान, हल्लेखोर मिश्रा यांच्या गावातीलच असून त्यांना अटक करण्यात आली आहे. आपसातील शत्रुत्वातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याचे पोलीस अधीक्षक दिलीप कुमार यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज