अ‍ॅपशहर

कानपूरमध्ये पत्रकाराची गोळी झाडून हत्या

गेल्या काही दिवसांपासून देशभरात पत्रकारांवरील हल्ले वाढत असून आज कानपूरमधील बिल्हौर तालुक्यात एका पत्रकाराची गोळी मारून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 30 Nov 2017, 9:21 pm
कानपूर: गेल्या काही दिवसांपासून देशभरात पत्रकारांवरील हल्ले वाढत असून आज कानपूरमधील बिल्हौर तालुक्यात एका पत्रकाराची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम journalist shot dead by unidentified bike borne persons in kanpur
कानपूरमध्ये पत्रकाराची गोळी झाडून हत्या


हत्या करण्यात आलेला पत्रकार एका हिंदी दैनिकाचा वार्ताहर असून नवीन श्रीवास्तव असे या वार्ताहराचे नाव आहे. नवीनवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळी लागल्यानंतर नवीन यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पोलिसांचा शोध सुरू

हल्ल्याची माहिती मिळताच वेळ न दवडता पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेणे सुरू केले आहे. हे मारेकरी बाईकवर आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

नवीन यांच्यावर एकूण ३ ते ४ हल्लेखोरांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हल्ला झाला त्यावेळी नवीन आपल्या दुकानात बसले होते. आपण लवकरात लवकर मारेकऱ्यांना पकडण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज