अ‍ॅपशहर

kanhaiya kumar : कन्हय्या कुमारनी भाकपा का सोडली? डी. राजांनी सांगितलं

कन्हय्या कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेस प्रवेशावरून कन्हय्या कुमार यांच्यावर भाकपचे नेते डी. राज बरसले. कन्हय्या कुमार स्वतः पक्ष सोडून गेल्याचं राजा यांनी सांगितलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2021, 12:29 am
नवी दिल्लीः कन्हया कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) सोडून मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावर सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते कन्हया कुमार यांनी स्वतः सीपीआय सोडली आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कन्हया कुमार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (CPI) नेतृत्वाशी प्रामाणिक नव्हते आणि त्यांनी पक्षाकडे आपल्या मागण्या स्पष्टही केल्या नाहीत, असा आरोप डी. राजा यांनी केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kanhaiya kumar joins congress cpi leader d raja slams
कन्हय्या कुमारनी भाकपा का सोडली? डी. राजांनी सांगितलं


कन्हय्या कुमार हे स्वतः पक्षातून बाहेर पडले. कन्हय्या कुमार पक्षाशी प्रामाणिक नव्हते. कन्हया कुमार पक्षात येण्याच्या पूर्वीपासून भाकपा (CPI) होती आणि त्यांच्या गेल्यानंतरही राहील, असं म्हणत डी राजा यांनी कन्हया कुमारच्या कम्युनिस्ट विचारधारेवरील विश्वासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

jignesh mewani : काँग्रेसच्या मंचावर येऊनही जिग्नेश मेवाणींनी पक्षात प्रवेश का केला नाही? दिले स्पष्टीकरण

भाकपा जातीहिन, वर्गहिन समाजासाठी लढत आहे. पण कन्हय्या कुमारच्या काही वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि आकांक्षा असाव्यात. म्हणजेच कम्युनिस्ट आणि कामगार वर्गाच्या विचारधारेवर कन्हय्या कुमारचा विश्वास नसल्याचं यावरून दिसून येतंय, अशी जोरदार टीका डी. राजा यांनी केली.

kanhaiya kumar : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच कन्हय्या कुमारांचा PM मोदी आणि RSS वर नि

कन्हय्या कुमार यांनी मंगळवारी दिल्लीत राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जेएनयूमधील विद्यार्थी नेता असलेले कन्हय्या कुमार यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाकपमध्ये प्रवेश केला. त्यांनी बिहारमधील बेगूसराय इथून भाजपच्या गिरीराज सिंहांविरोधात निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला.

महत्वाचे लेख