अ‍ॅपशहर

'जेएनयू'त कन्हैयाकुमारवर हल्ला

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारवर हल्ला झाल्याचे समजते. विद्यापीठाच्या अॅडमिन ब्लॉकजवळ काही विद्यार्थ्यांशी बोलत असताना एका व्यक्तीने त्याला शिवीगाळ करून त्याच्या कानशिलात भडकावली, असं सांगण्यात येतं.

Maharashtra Times 10 Mar 2016, 8:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kanhaiya kumar slapped and abused in jnu
'जेएनयू'त कन्हैयाकुमारवर हल्ला

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारवर हल्ला झाल्याचे समजते. विद्यापीठाच्या अॅडमिन ब्लॉकजवळ काही विद्यार्थ्यांशी बोलत असताना एका व्यक्तीने त्याला शिवीगाळ करून त्याच्या कानशिलात भडकावली, असं सांगण्यात येतं.

कन्हैयाकुमारवर विकास नावाच्या व्यक्तीने हल्ला केला. मात्र तो जेएनयूतील नसल्याचे सांगण्यात आले. कन्हैयावर हल्ला करणाऱ्या विकासला पकडण्यात आले असून याबाबत पोलिसांना कळवण्यात आलं आहे.

देशविरोधी घोषणा केल्याच्या आरोपामुळे कन्हैयाला अटक करण्यात आली होती. सध्या त्याला जामिनावर सोडण्यात आलं आहे. पण त्यानंतर लष्कराच्या जवानांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पुन्हा तो अडचणीत आला आहे. सुरक्षा दलांचे जवान काश्मीरमध्ये महिलांवर अत्याचार करतात, असे वक्तव्य त्यानं केलं होतं. त्यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. माजी सैनिक, भाजपचे नेते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी कन्हैयावर टीका केली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज